मुंबई

कल्याणातील बी . के. बिर्ला महाविद्यालयामध्ये विकिपीडिया कार्यशाळा संपन्न

CD

बी. के. बिर्ला महाविद्यालयामध्ये विकिपीडिया कार्यशाळा
कल्याण (वार्ताहर) ः राज्य मराठी विकास संस्था आणि मराठी विभाग बी. के. बिर्ला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी विकिपीडिया परिचयात्मक कार्यशाळा उत्साहात पार पडली. या कार्यशाळेला मार्गदर्शक म्हणून राज्य मराठी विकास संस्थेचे प्रकल्प साहाय्यक विकास कांबळे उपस्थित होते. या कार्यशाळेच्या उद्‍घाटनाप्रसंगी मराठी विकिपीडियाविषयी माहिती देताना विकास कांबळे म्हणाले की, मराठी भाषेतील कोणतीही माहिती शोधण्यासाठी विश्वकोशाची मदत घ्यावी होती. विविध कोश किंवा विश्वकोशाचे खंड हाताळणे जिकिरीचे झाले होते. आज तंत्रज्ञानाच्या युगामध्ये कोणतीही माहिती शोधताना संगणकाचा उपयोग केला जात आहे. मराठी विकिपीडिया हे मुक्त ज्ञानाचे भांडार आहे. या कार्यक्रमात मोडिलिपी सहाय्यक योगेश सावंत यांनीही विद्यार्थ्यांना विकिपीडिया संदर्भातील प्रात्यक्षिक स्वरूपात मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी डॉ. अनुप्रिया खोब्रागडे, डॉ. भाऊसाहेब ननावरे, प्रा. प्रेरणा जगताप, प्रा. रिद्धीसिध्दी गायकवाड व हिंदी विभाग प्रमुख बालकवी लक्ष्मण सुरंजे व प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या संयोजनासाठी डॉ. दौलतराव कांबळे व मराठी विभागाच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army Rocket System: आता शत्रूंची खैर नाही! पोखरणमध्ये पिनाका रॉकेटची यशस्वी चाचणी; भारताच्या संरक्षणशक्तीला नवी उंची

Exam Paper Theft: धक्कादायक! दहावीच्या विद्यार्थ्यानेच चोरली प्रश्नपत्रिका; सांगोला विद्यामंदिरात खळबळ..

Latest Marathi News Live Update : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शेगावात भक्तांची मोठी गर्दी; 'गण गण गणात बोते'चा जयघोष

Education Director Killed : पलूस हादरलं! शिक्षण संस्थेच्या संचालकाचा निर्घृण खून; मुलाने पार्किंगमध्ये रक्ताच्या थारोळ्यात वडिलांचा मृतदेह पाहिला अन्...

ही मालिका मिळूदे म्हणून बोलले आणि... गुढी पाडव्याला गावाला जाणार आहे विजय बाबर; अभिनेत्रींनी सांगितले खास प्लॅन

SCROLL FOR NEXT