मुंबई

ग्रामीण भागातील मुलांना व्यासपीठ

CD

ग्रामीण भागातील मुलांना व्यासपीठ
जव्हारच्या शाळेत ६२६ विद्यार्थ्यांचा सहभाग
जव्हार, ता. १८ (बातमीदार)ः विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले सुप्त गुण वृद्धिंगत करण्यासाठी ‘सकाळ’ने भरवलेल्या चित्रकलेच्या स्पर्धेला जव्हार परिसरातील ६२६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. जव्हार येथे ज्ञानगंगा इंग्लिश स्कूल येथे ही स्पर्धा झाली.
या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी चित्रकलेबाबत विविध पैलूंचा वापर करीत अतिशय सुंदर, शिस्तबद्ध पद्धतीने चित्र रेखाटली. तालुक्यातील आदिवासी आणि ग्रामीण भागात अनेक अडचणींचा समस्यांचा डोंगर आहे. या सगळ्या गोष्टींवर मात करत विद्यार्थ्यांची कल्पकता, विचारशक्तीला चालना मिळण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त असल्याचे परीक्षार्थींच्या पालकांनी बोलताना सांगितले. या चित्रकला स्पर्धेला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हारचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी दीपक टिके, सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय भुसाळ, विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, यांनी भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले. या वेळी ज्ञानगंगा इंग्लिश स्कूलचे सर्व शिक्षक, शिक्षिका तसेच शिक्षिकेतर कर्मचारी यांनी सकाळ चित्रकला स्पर्धा यशस्वितेसाठी मोलाचे सहकार्य केले.
--------------------------
राज्यभरात विद्यार्थ्यांची चित्रकलेची आवड व्यक्त व्हावी, यासाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करून एक नावीन्यपूर्ण उपक्रम जव्हारसारख्या ग्रामीण भागात सकाळने राबवला आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व वैचारिक पातळीत चांगली वाढ होणार आहे.
- दीपक टिके, सहाय्यक प्रकल्प अधिकारी, जव्हार
------------------------
जव्हार शहरात सर्व शाळा एकत्र येऊन सार्वजनिकरीत्या सकाळ चित्रकला स्पर्धा हा उपक्रम राबविला. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांचे कौशल्य पणास लागून त्यांची बौद्धिक भरभराट होऊन त्यांच्या ज्ञानात भर पडणार आहे. सध्याच्या डिजिटल युगातही त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळेल.
- मधुकर मुर्तडक, संस्था विश्वस्त
------------------------------
सकाळ चित्रकला स्पर्धेसाठी पालकांसह विद्यार्थी गेल्या काही दिवसांपासून तयारी करत होते. त्यामुळे ही स्पर्धा खरोखरच चांगले व्यासपीठ आहे.
- संदीप वडनेरे, मुख्याध्यापक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘या’ शेतकऱ्यांना नाही कर्जमाफीचा लाभ! ३० सप्टेंबर २०२५ पूर्वीचे थकबाकीदार शेतकऱ्यांनाच दोन लाखांची पीक कर्जमाफी, वाचा...

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ जाहीर! राज्यात काय स्वस्त झालं, कोणत्या गोष्टी महागल्या? संपूर्ण यादी जाणून घ्या...

Iran-Israel War: दुबईकडे केवळ १० दिवस पुरेल एवढाच अन्नसाठा; फळही नाहीत अन् भाज्यांचाही तुटवडा

Pune News: ''पुण्यातील बाजारपेठ शहराबाहेर स्थलांतरित...'', केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मोठं विधान

Baramati News : बारामती तालुक्याला वरदान ठरणाऱ्या नीरा कऱ्हा उपसा सिंचन योजनेला राज्य शासनाची मान्यता....

SCROLL FOR NEXT