मुंबई

नवी मुंबईमध्ये ७१ हजार ‘नोटा‌’ मतदान

CD

बेलापूर, ता. १८ (बातमीदार) : नवी महापालिका निवडणुकीत यंदा राजकीय समीकरणांइतकेच ‌‘नोटा‌’ या पर्यायाने सगळ्यांचे लक्ष वेधले. २८ प्रभागांतील १११ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत नऊ लाख ४८ हजार ४६० मतदारसंख्या होती. २०१५ मध्ये ४८ टक्के मतदान झाले असताना यंदा बहुसदस्यीय पॅनेल निवडणुकीत तब्बल ५७.१५ टक्के मतदान झाले, मात्र मतदानात ‌‘नोटा‌’ला तब्बल ७१ हजार ५३० मते मिळाल्याने राजकीय पक्षांसाठी आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे.

महापालिका निवडणुकीत प्रमुख पक्षांमध्ये तीव्र लढत दिसून आली. अनेक प्रभागांत विद्यमान नगरसेवक, नातेवाइकांतील राजकीय संघर्ष, तर काही ठिकाणी अपक्ष उमेदवारांची चुरस पाहायला मिळाली. निकाल हाती आले आणि भाजप अग्रस्थानी राहत शिवसेनेने नवी मुंबईतील दुसरा पक्ष म्हणून स्थान पटकावले. मात्र, याचवेळी दुसरीकडे बहुतांश नागरिकांनी पॅनेल पद्धतीतील गोंधळ, नावडता उमेदवार यामुळे असंतोषाचा नोटा पर्याय निवडल्याचे दिसून आले. परिणामी वाढती नोटा पर्यायाची पसंती भविष्यातील मोठी धोक्याची घंटा मानली जात असून, निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी पुढच्या पाच वर्षांत चांगली कामे करून नागरिकांची मने जिंकण्याचे आवाहन त्यांच्यासमोर असणार आहे.

‘नोटा‌’ पसंती चिंताजनक
लोकशाही व्यवस्थेत ‌‘नोटा‌’ हा पर्याय केवळ एक तांत्रिक सुविधा नसून मतदारांच्या असंतोषाचा थेट आवाज मानला जातो. नवी मुंबईसारख्या वेगाने विकसित होत असलेल्या शहरात मोठ्या प्रमाणात मतदारांनी कोणत्याही उमेदवाराला न पसंत करता ‌‘नोटा‌’ची निवड करणे, चिंताजनक ठरत आहे.

प्रभाग २५ मध्ये सर्वाधिक निवड
प्रभाग क्रमांक २५ मधील क वर्गात भाजपच्या नेत्रा शिर्के यांनी ८,६३१ मते घेत बहुमताने विजय मिळवला. पराभूत उमेदवार शिवसेनेच्या सुजाता गुरव यांना ४,७२८ मते मिळाली. परंतु याच वर्गात तब्बल दोन हजार ३९८ मते नोटाला मिळाल्याचे दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: सुप्रीम कोर्ट संतापलं! आदेश न पाळणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा, उशिरा अपीलही चालणार नाही

Donald Trump : एपस्टीन फाईल्सचा दुसरा पार्ट! डोनाल्ड ट्रम्पनी १५ वर्षांच्या बालिकेवर अत्याचार केल्याचा आरोप, अमेरिका सरकारने कागदपत्रे केली सार्वजनिक

Pune News : आशासेविका मानधनाविना; तब्बल दोन हजार महिलांना पाच महिन्यांपासून निधी नाही

Latest Marathi News Live Update : शेवटची गोळी आणि सैनिक असेपर्यंत आम्ही लढणार; इराणचे उपपरराष्ट्रमंत्री सईद खतीबजादेह यांचा ठाम निर्धार

Success Story: शेतकऱ्याच्या मुलाची भरारी; अजित देशमुख यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड

SCROLL FOR NEXT