मुंबई

जव्हारचा परिक्षित शरीरसौष्ठवात चमकला

CD

जव्हारचा परिक्षित शरीरसौष्ठवात चमकला
एकाच महिन्यात पटकावली तीन पदके

जव्हार, ता. २० (बातमीदार) : जव्हारचा सुपुत्र परिक्षित अक्रेकर याने राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धांमध्ये पदकांचा पाऊस पाडला आहे. या युवा खेळाडूच्या कामगिरीमुळे पालघरच्या क्रीडा वर्तुळातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
जव्हार तालुक्याचे नाव राज्य स्तरावर उज्ज्वल करताना परिक्षितने मुंबईत झालेल्या तीन प्रतिष्ठित शरीरसौष्ठव स्पर्धांमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. दि. १० डिसेंबर २०२५ रोजी ‘मुंबई श्री २०२५ (मेन फिजिक)’ स्पर्धेत द्वितीय क्रमांक (रौप्यपदक), तर दि. २१ डिसेंबर २०२५ रोजी ‘मुंबई २०२५ बॉडी बिल्डिंग’ स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदकावर मोहर उमटवली. तसेच दि. २७ डिसेंबर २०२५ रोजी ‘भायखळा नवयुग श्री २०२५’ स्पर्धेत पुन्हा एकदा द्वितीय क्रमांक पटकावत आपली सातत्यपूर्ण कामगिरी सिद्ध केली. एकाच महिन्यात तीन मोठी पदके जिंकून परिक्षितने जव्हारच्या क्रीडा वैभवात भर घातली आहे. दुर्गम भाग असलेल्या जव्हारमधील तरुणाने शरीरसौष्ठवात मिळवलेले यश जव्हार तालुक्यासह पालघर जिल्हा क्रीडा क्षेत्रात ‘पॉवरहाउस’ ठरत असल्याचे चित्र आहे, शिवाय या खेळाडूच्या यशामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील आगामी खेळाडूंना मोठी प्रेरणा मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Israel War मुळे भारतात दारूचा दुष्काळ? उन्हाळ्यात थंड बिअरही मिळणार नाही? उत्पादनावर काय परिणाम होणार

IPL 2026: 'रोहित शर्मा डगआऊटमधून २० ओव्हर पाहू शकत नाही, त्याला...', माजी क्रिकेटरचा मुंबई इंडियन्सला स्पष्ट सल्ला

Gudhipadwa Holiday: गुढीपाडव्याला बँका आणि शेअर बाजार बंद की सुरू? जाणून घ्या RBI आणि NSE ची अधिकृत माहिती

Latest Marathi News Live Update : पुण्यात पिरंगुट घाटात कार दरीत कोसळली

Kolhapur Headmaster Tragedy : निलंबनाचे नैराश्य मुख्याध्यापकाने थेट आंब्याच्या झाडाला घेतला गळफास, कोल्हापुरातील घटना

SCROLL FOR NEXT