मुंबई

एमआयडीसी रस्त्यांवरील झाडे करपली

CD

एमआयडीसी रस्त्यांवरील झाडे करपली
देखभालीच्या अभावावर प्रश्नचिन्ह
तुर्भे, ता. २० (बातमीदार) : नवी मुंबईतील एमआयडीसी परिसरातील प्रमुख रस्त्यांच्या दुभाजकांवर लावलेली शोभेची झाडे अलीकडे मोठ्या प्रमाणात करपत असून, दुभाजकांचे हरित सौंदर्य हरवत आहे. प्रदूषण असलेल्या औद्योगिक पट्ट्यात ही झाडे धूळ व तापमान नियंत्रणासाठी महत्त्वाची ठरत होती. मात्र, देखभालीकडे होत असलेले दुर्लक्ष, वाढलेला उन्हाचा तडाखा आणि पाण्याअभावी अनेक रोपे सुकल्याचे चित्र दिसते. त्यामुळे नागरिकांनी चिंता व्यक्त करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
ठाणे-बेलापूर मार्गासह एपीएमसी व एमआयडीसीतील अनेक अंतर्गत रस्त्यांवर लावलेली रोपटी सुरुवातीला दुभाजकांची शोभा वाढवत होती. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून पाणीपुरवठा व देखभाल कमी झाल्याने माती कोरडी पडली असून काही ठिकाणी झाडे पूर्णपणे नष्ट झाली आहेत. रस्ते दुरुस्ती व केबल टाकणीसारख्या कामांमुळे झाडांच्या मुळांनाही इजा पोहोचल्याने परिस्थिती अधिक बिघडली आहे.

चौकट
प्रदूषण नियंत्रणासाठी झाडांचे महत्त्व
एमआयडीसीसारख्या औद्योगिक क्षेत्रात रस्त्यांवरील दुभाजकातील झाडे केवळ शोभा नव्हे, तर हवेत असलेले धूलिकण कमी करणे, तापमानाचा ताण कमी करणे आणि वाहनांमधून निघणाऱ्या प्रदूषकांवर नैसर्गिक नियंत्रण ठेवणे या दृष्टीने अत्यंत आवश्यक असतात. झाडे करपल्याने उष्णता वाढत असून, रस्त्यावर प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना आणि पादचाऱ्यांना प्रत्यक्ष त्रास होत आहे. त्यामुळे नागरिकांनी करपलेली झाडे बदलून नव्या रोपांची लागवड व नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काव्या मारनने एवढ्या आनंदाने अबरार अहमदला संघात घेतले; पाकड्यांनी दाखवली लायकी, The Hundred मधून घेऊ शकतो माघार...

Love-Jihad: आता धर्म बदलणं कठीण होणार, लव्ह जिहाद करणाऱ्यांना शिक्षा मिळणार; महाराष्ट्र सरकारकडून विधेयक सादर

Narhari Zirwal : अन्न भेसळीविरोधात झिरवाळ आक्रमक! १९७ नवीन अधिकाऱ्यांची फौज मैदानात, कठोर कायद्याची तयारी

Devendra Fadanvis: 'गॅससाठी रांगा लावू नका', फडणवीस नेमकं काय म्हणाले?

Pimpalgaon Ttoll Plaza : टोल की लूट? पूर्वसूचना न देता स्थानिक पास धारकांना बसतोय आर्थिक फटका; आंदोलनाचे संकेत

SCROLL FOR NEXT