मुंबई

२५ शिक्षक टीईटीत यशस्वी

CD

२५ शिक्षकांचे ‘टीईटी’ परीक्षेत यश
६० टक्के निकालाने वेधले लक्ष
डोंबिवली, ता. २१ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शिक्षकांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. परीक्षेला बसलेल्या ३५ पैकी तब्बल २५ शिक्षक पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाले असून, या निकालाची टक्केवारी ६० टक्क्यांच्या घरात आहे. राज्याचा सरासरी निकाल तीन ते चार टक्के लागत असताना, कल्याण-डोंबिवलीच्या शिक्षकांनी ६० टक्के निकाल मिळवून गुणवत्तेवर शिक्कामोर्तब केले. पाच शिक्षकांनी पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी अशा दोन्ही स्तरांचे पेपर उत्तीर्ण होण्याचे यश मिळवले आहे. शाळा सांभाळत ऑनलाइन माध्यमातून अभ्यास करून या शिक्षकांनी हे यश संपादन केले.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, पाच वर्षांपेक्षा अधिक सेवा झालेल्या शिक्षकांनाही ही परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे. या सक्तीला शिक्षक संघटनांकडून विरोध होत असताना आणि पुनर्विचार याचिका प्रलंबित असतानाही, पालिकेच्या शिक्षकांनी या अटीला स्वतःला सिद्ध करण्याची संधी मानून परीक्षेला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. शिक्षणाधिकारी विजय सरकटे आणि प्रज्ञासनाधिकारी भारत बोरनारे यांच्या मार्गदर्शनाखाली या शिक्षकांना परीक्षेसाठी प्रोत्साहित करण्यात आले होते. यशस्वी शिक्षकांमध्ये नीलेश वाबळे, कुंदन नेमाडे, तन्वी बागवे, प्रवीण दलाल यांच्यासह २५ शिक्षकांचा समावेश असून, त्यांच्या या यशामुळे पालिका शिक्षण विभागात आनंदाचे वातावरण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : गुढीपाडव्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट

Education Director Killed : पलूस हादरलं! शिक्षण संस्थेच्या संचालकाचा निर्घृण खून; मुलाने पार्किंगमध्ये रक्ताच्या थारोळ्यात वडिलांचा मृतदेह पाहिला अन्...

ही मालिका मिळूदे म्हणून बोलले आणि... गुढी पाडव्याला गावाला जाणार आहे विजय बाबर; अभिनेत्रींनी सांगितले खास प्लॅन

Jaykumar Gore: कायदा-नियम बदलू, पण मराठा समाजाचे प्रश्न सोडवू: पालकमंत्री जयकुमार गोरे; मला बाहेरचा म्हणू शकत नाही, नेमकं काय म्हणाले?

Maharashtra Weather Update : राज्यात अवकाळी अन् गारपिटीचे संकट, ७ जिल्ह्यांना अलर्ट जारी; पुढील २ दिवस धोक्याचे

SCROLL FOR NEXT