मुंबई

शिवसेना (ठाकरे) पक्षाची नगरसेविका सारिका म्हस्के फुटली

CD

मुंबईत ठाकरे गटाची नगरसेविका फुटली
गटनेतेपदी किशोरी पेडणेकर यांची नियुक्ती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : मुंबई महापालिकेत शिवसेना ठाकरे गटाच्या गटनेतेपदी माजी महापौर तथा नगरसेविका किशोरी पेडणेकर यांची निवड करण्यात आली. शिवसेना भवन येथील बैठकीत त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर कोकण भवन येथे नोंदणी करण्यासाठी गेलेल्या ६५ नगरसेवकांपैकी प्रभाग क्रमांक १५७च्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के अनुपस्थित होत्या. त्या नॉट रिचेबल असल्याने ठाकरे गटाच्या ६४ नगरसेवकांनीच नोंदणी केली.
महापालिका निवडणुकीनंतर महापौर निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गुरुवारी आरक्षण सोडत निघाल्यानंतर याबाबतच्या हालचालींना वेग येईल; मात्र तत्पूर्वी महापालिकेत पक्षांचे गटनेते नियुक्तीची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, ठाकरे गटाने माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची गटनेतेपदी निवड केली. त्यानंतर नियमानुसार कोकण भवन येथे गटाची नोंदणी करण्यासाठी नगरसेवक पोहोचले; मात्र त्या ठिकाणी ६५ पैकी ६४ नगरसेवकच उपस्थित असल्याचे लक्षात आले. प्रभाग क्रमांक १५७ मधून विजयी झालेल्या डॉ. सरिता म्हस्के तेथे न पोहोचल्याने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्या ‘नॉट रिचेबल’ असल्याचे समोर आले. या पार्श्वभूमीवर महापौर निवडणुकीपूर्वीच एक नगरसेविका फुटल्याने ठाकरेंना हा मोठा धक्का मानला जात आहे.
----
कारवाईबाबत हालचाली
गटनेतेपदी निवड झाल्यानंतर संबंधित पक्षाला कोकण भवन येथे जाऊन आपल्या गटाची नोंदणी करावी लागते. या वेळी पक्षातर्फे निवडून आलेले सर्व नगरसेवक उपस्थित राहणे बंधनकारक आहे; मात्र या वेळी जाणीवपूर्वक गैरहजर राहिल्यास संबंधित नगरसेवकांवर पक्षातर्फे कारवाई केली जाते. त्यामुळे ठाकरे गट त्यांच्यावर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
...............
कोकण भवनला ६५ पैकी एक नगरसेविका गैरहजर राहिल्याचे दिसते आहे; मात्र हा घोडेबाजार आहे. याबाबत कठोर नियम आणला पाहिजे. गैरहजर राहिलेल्या नगरसेविकेवर कारवाईचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील.
- किशोरी पेडणेकर, गटनेत्या, शिवसेना ठाकरे गट
............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur IT Park : अखेर मंत्रीमंडळ निर्णय झालाच! कोल्हापुरात शेंडा पार्कमध्ये 34 हेक्टर 36 गुंठे जागेत आयटी पार्क विकसित करण्यासाठी प्रस्ताव मंजूर

Mumbai News: सुरक्षा धर्मापेक्षा महत्त्वाची; विमानतळाजवळ नमाज पडण्याचा अधिकार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा स्पष्ट निर्णय

‘बायको पाहिजे’चं पोस्टर सोशल मीडियावर घालतंय धुमाकूळ; व्हायरल पोस्टर बॉय नेमका कोण ?

T20 WC, IND vs ENG SF: नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने! सूर्याने सांगितला आम्हाला हवं तेच झालं; Playing XI मध्ये बघा काय बदल झाला

Horoscop : उद्या 6 मार्चला 'या' 6 राशींचं नशीब चमकणार! अचानक मिळेल मोठी खुशखबर; आर्थिक लाभ संभवतो, नात्याला मिळेल नवी दिशा

SCROLL FOR NEXT