मुंबई

केईएमची शतकी झेप!

CD

केईएमची शतकी झेप!
१७ मजली टॉवरसह आधुनिक आरोग्यसेवेकडे दमदार वाटचाल; रुग्ण, विद्यार्थी, डॉक्टरांसाठी सर्वसमावेशक सुविधा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : परळमधील केईएम रुग्णालयाने १०० वर्षांचा गौरवशाली वारसा जपत आधुनिक आरोग्यसेवेच्या दिशेने मोठी झेप घेतली आहे. १७ मजली नव्या टॉवरसह केंद्रित प्रयोगशाळा, अत्याधुनिक उपचार सुविधा आणि रुग्ण, विद्यार्थी, डॉक्टरांसाठी सर्वसमावेशक सोयी उभारून केईएम राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत नवा मानदंड निर्माण करीत आहे. गुरुवारी (ता. २२) झालेल्‍या वर्धापनदिन कार्यक्रमाला वैद्यकीय क्षेत्रासह विविध मान्यवरांनी उपस्‍थिती लावून रुग्‍णालयाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्‍या.
या कार्यक्रमाला उपस्‍थित पालिका प्रमुख रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. शैलेश मोहिते, डॉ. मोहन देसाई, डॉ. हरीश पाठक यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवकांनीही केईएम रुग्णालयाचे कौतुक केले. रुग्णसेवा अधिक सुलभ, दर्जेदार आणि सर्वसमावेशक करण्यावर भर देत रुग्णालयात अनेक महत्त्वाचे प्रकल्प प्रगतिपथावर आहेत.
केईएममध्ये उभारण्यात येणारा १७ मजली नवा टॉवर हे याचे प्रमुख उदाहरण आहे. या टॉवरमध्ये सर्व प्रयोगशाळा (लॅब्ज) एकाच ठिकाणी केंद्रित करण्यात येणार असून रक्त तपासणी, एक्स-रे इत्यादींसाठी रुग्णांना वेगवेगळ्या इमारतींमध्ये फिरावे लागणार नाही. या टॉवरचे १२ मजले पूर्ण झाले असून, वर्षअखेरीस संपूर्ण प्रकल्प पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
विद्यार्थी व निवासी डॉक्टरांच्या सोयीसाठीही मोठ्या प्रमाणावर सुविधा उभारण्यात आल्या आहेत. अ‍ॅकवर्थ येथे १,२०० विद्यार्थ्यांची क्षमता असलेले नवे हॉस्टेल जवळपास पूर्ण झाले असून, लवकरच एक विंग कार्यान्वित होणार आहे. या संकुलात जनरल लायब्ररी, कॅन्टीन आणि निवासाच्या अत्याधुनिक सुविधा असतील, ज्यामुळे डॉक्टर आणि विद्यार्थ्यांना नवीनतम तंत्रज्ञानाचे वातावरण मिळणार आहे.

रुग्‍णांच्या नातेवाइकांसाठी सुविधा
रुग्णांच्या नातेवाइकांसाठी मन:शांती देणाऱ्या सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत. सुशोभित गॅझिबो, फाउंटन आणि विश्रांतीसाठी जागा तयार करण्यात आली असून, कठीण काळात थांबलेल्या नातेवाइकांना दिलासा मिळावा, हा त्यामागचा उद्देश आहे. याशिवाय सीएसआरमधून उभारलेला नवा रुग्ण नोंदणी परिसर आणि संपूर्ण रुग्णालयात लागू केलेल्या एचएमआयएस प्रणालीमुळे कामकाज पूर्णतः संगणकीकृत झाले आहे. रुग्णालयातील वारसा जपताना एमएलटी सभागृहातील जुने हेरिटेज बेंचेस न बदलता त्यांचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. तसेच नव्या बर्न वॉर्डमध्ये आयसीयू व डायलिसिस युनिटसह पुरुष, महिला व बालरुग्णांसाठी स्वतंत्र उपचार सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

खेळाडूंवर उपचार
क्रीडा दुखापतींसाठी अत्यल्प दरात शस्त्रक्रिया, भरती आणि पुनर्वसन देणारे स्पोर्टस् सेंटर, अँटिस्नेक व्हेनम उपचार, मालवणी सेंटरचा विस्तार, नेत्ररोगासाठी मॉड्युलर थिएटर, आयव्हीएफ सेंटर, हृदय प्रत्यारोपणासाठी नवे मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आणि लवकरच सुरू होणारे बोन मॅरो ट्रान्सप्लांट युनिट अशा अनेक उपक्रमांमुळे केईएम रुग्णालय राज्यातील आरोग्यसेवेत नवा मानदंड प्रस्थापित करीत आहे.

हेलिपॅडचे नियोजन
भविष्यात ‘आयुष्मान शताब्दी टॉवर’ आणि त्यावर हेलिपॅडची सुविधा उभारण्याची मागणीही करण्यात आली असून, त्‍यामुळे आपत्कालीन प्रत्यारोपण सेवा अधिक वेगवान होणार आहे. १०० वर्षांची परंपरा जपत केईएम रुग्णालय आधुनिकतेकडे ठामपणे वाटचाल करीत आहे.

केईएम रुग्णालयाने गौरवशाली सेवेची १०० वर्षे पूर्ण केली. सर्वसामान्य नागरिकांसाठी दर्जेदार, विश्वासार्ह आणि तज्ज्ञ आरोग्यसेवेचा मानदंड केईएमने निर्माण केला आहे. विविध नवे उपक्रम आणि सुधारणा प्रायोगिक तसेच अंमलबजावणीच्या टप्प्यात आहेत.
- शरद उघडे,
उपायुक्त, पालिका (आरोग्य)

समाजासाठी नि:स्वार्थ सेवा करणाऱ्या दात्यांची परंपरा जपत केईएमने पुढील काळातही आधुनिकतेकडे वाटचाल करावी.
- मंगलप्रभात लोढा,
कौशल्य, रोजगार मंत्री

केईएममध्ये गेल्या अनेक वर्षांत अनेक बदल झाले आहेत. १०० वर्षांचा गौरवशाली वारसा जपत केईएममध्ये १७ मजली नवा टॉवर, केंद्रित लॅब्स आणि अत्याधुनिक सुविधा उभारून रुग्ण, विद्यार्थी व डॉक्टरांसाठी सर्वसमावेशक आरोग्यसेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- डॉ. संगीता रावत,
अधिष्ठाता, केईएम रुग्णालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Israel War मुळे भारतात दारूचा दुष्काळ? उन्हाळ्यात थंड बिअरही मिळणार नाही? उत्पादनावर काय परिणाम होणार

IPL 2026: 'रोहित शर्मा डगआऊटमधून २० ओव्हर पाहू शकत नाही, त्याला...', माजी क्रिकेटरचा मुंबई इंडियन्सला स्पष्ट सल्ला

Gudhipadwa Holiday: गुढीपाडव्याला बँका आणि शेअर बाजार बंद की सुरू? जाणून घ्या RBI आणि NSE ची अधिकृत माहिती

Latest Marathi News Live Update : पुण्यात पिरंगुट घाटात कार दरीत कोसळली

Kolhapur Headmaster Tragedy : निलंबनाचे नैराश्य मुख्याध्यापकाने थेट आंब्याच्या झाडाला घेतला गळफास, कोल्हापुरातील घटना

SCROLL FOR NEXT