मुंबई

‘एमआयएम’च्या गटनेतेपदी विजय उबाळे यांची निवड

CD

‘एमआयएम’च्या गटनेतेपदी
विजय उबाळे यांची निवड

‘स्थायी’साठी जमीर कुरेशी, तर प्रभाग समितीसाठी खैरुन्निसा यांची नावे

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : मुंबई महापालिकेतील एमआयएम पक्षाच्या गटनेतेपदी प्रभाग क्रमांक १४०मधून विजयी झालेल्या विजय उबाळे यांची निवड करण्यात आली आहे. प्रभाग समितीसाठी खैरुन्निसा आणि स्थायी समितीसाठी जमीर कुरेशी यांची नावे पक्षाने निश्चित केली आहेत. प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील यांनी ही माहिती दिली.

मुंबई महापालिका निवडणुकीत ‘एमआयएम’चे आठ उमेदवार नगरसेवकपदी निवडून आले आहेत. त्यात विजय उबाळे हे एकमेव मुस्लिमेतर आहेत. गणितात एमएससी असलेले उबाळे नगरसेवक होईपर्यंत खासगी क्लास चालवत होते. त्यांच्या निवडीबद्दल इम्तियाज जलील म्हणाले, ‘पक्षाने मुंबई महापालिकेत गटनेता म्हणून विजय उबाळे यांची निवड करून चांगला संदेश दिला आहे. आमच्या पक्षाची सर्व समाजांना समान न्याय देण्याची भूमिका आहे. सात मुस्लिम नगरसेवक असताना आम्ही उबाळे यांना गटनेतेपदी संधी दिली आहे. यातून आमच्या पक्षाचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी सकारात्मक संदेश दिला आहे.’ पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी हैदराबादमध्ये असदुद्दीन ओवेसी यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
---
आपल्यावर माेठी जबाबदारी : उबाळे
पक्षाने आपल्यावर मोठी जबाबदारी दिली असून, यासाठी आपण नेतृत्वाचे आभारी आहोत. सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी कार्यरत राहून पक्षाने दिलेली जबाबदारी पूर्ण ताकदीने व प्रामाणिकपणे पार पाडू, असा विश्वास विजय उबाळे यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran War Statement : खैमेनींच्या माघारी इराणचे प्रमुख खतीबजादेह यांची जबाबदारी, शेवटची गोळीपर्यंत लढण्याचा केला निर्धार, युद्ध आणखी पेटणार

Gold Rate Today: आज सोन्याच्या भावात मोठा बदल! एक तोळा सोन्याचा भाव किती? जाणून घ्या ताजा भाव

Axar Patel: अहमदाबादमध्ये सामना? मैं हूँ ना ! अंतिम सामन्याबाबत अक्षर पटेलकडून निर्धास्त राहण्याचा दिलासा

Latest Marathi News Live Update : कामठीत मोकाट कुत्र्यांचा कहर, एका दिवसात १४ नागरिकांना चावा

Success Story: गिरवीचा विशाल वाघ ठरला राज्यात अव्‍वल; पोलिस उपनिरीक्षकपदी निवड, सर्व स्तरांतून होतेय कौतुक

SCROLL FOR NEXT