मुंबई

सर्वसाधारण जागेमुळे चुरस वाढली

CD

त्रिशंकू अवस्थेमुळे सत्तास्थापनेचा पेच
भिवंडीत महापौरपद ‘सर्वसाधारण’ प्रवर्गासाठी
भिवंडी, ता. २२ (बातमीदार) : भिवंडी निजामपूर शहर महापालिकेच्या महापौरपदासाठी सर्वसाधारण आरक्षण जाहीर झाल्याने राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने महापालिकेत त्रिशंकू अवस्था निर्माण झाली असून, सत्तास्थापनेसाठी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही प्रमुख पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ९० जागांपैकी काँग्रेसने सर्वाधिक ३० जागा जिंकल्या आहेत, तर भाजपने २२ जागा मिळवल्या आहेत. भाजप-शिवसेना (शिंदे गट) महायुतीकडे एकत्रित ३४ जागा आहेत; मात्र बहुमतासाठी आवश्यक असलेल्या ४६ या आकड्यापर्यंत पोहोचण्यासाठी अपक्ष आणि छोट्या पक्षांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

भिवंडीच्या राजकारणात ‘किंगमेकर’ मानले जाणारे कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास पाटील यांची भूमिका यंदाही महत्त्वाची ठरणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शप) गटाचे काही नगरसेवक विलास पाटील यांच्या संपर्कात असल्याची चर्चा असून, त्यांच्या मदतीने सत्तेचे पारडे कोणत्या बाजूला झुकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या वेळी काँग्रेसकडे बहुमत असतानाही विलास पाटील यांच्या रणनीतीमुळे प्रतिभा पाटील महापौरपदी विराजमान झाल्या होत्या.

काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महायुतीने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली काही विशेष ‘राजकीय खेळी’ खेळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महापालिकेत कोणाकडेही स्पष्ट बहुमत नसल्याने येत्या काळात नगरसेवकांची फोडाफोडी आणि ‘अर्थकारणा’ला ऊत येण्याची दाट शक्यता राजकीय जाणकारांनी व्यक्त केली आहे.

दावे-प्रतिदाव्यांनी वातावरण तापले
‘काँग्रेसचाच महापौर बसेल,’ असा दावा स्थानिक नेत्यांकडून केला जात असतानाच, भाजपनेही सत्ता स्थापन करण्यासाठी कंबर कसली आहे. आरक्षण सर्वसाधारण निघाल्यामुळे दोन्ही पक्षांतील अनेक दिग्गज इच्छुक असून, कोणाच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

पक्षीय बलाबल (एकूण ९० जागा)
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस : ३०
भारतीय जनता पक्ष : २२
शिवसेना (शिंदे गट) : १२
राष्ट्रवादी काँग्रेस (शप) : १२
समाजवादी पक्ष : ०६
कोणार्क विकास आघाडी : ०४
भिवंडी विकास आघाडी : ०३
अपक्ष : ०१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: प्रेयसीचा मॅसेज आला अन् भेटायला गेला …; काही तासांतच आईला फोन, प्रेमसंबंधातून तरूणाला संपवलं, कोथरूडमध्ये काय घडलं?

LPG गॅस कमतरतेच्या अफवा वाढल्या अन् प्ले स्टोअरवर झाला धूमाकुळ; नंबर 1 डाउनलोडवर पोहोचले 'हे' ॲप, जाणून घ्या का वाढली डिमांड

पश्चिम बंगाल, तामिळनाडू अन् आसामसह पाच राज्यात वाजवणार बिगुल, केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद...

अरे व्वा! अनुष्का शेट्टी लवकरच करणार लग्न? वयाच्या 44 व्या वर्षी व्यावसायिकासोबत बांधणार लग्नगाठ?

Rasgulla Choking Death : लग्नात जेवताना घशात रसगुल्ला अडकल्याने मृत्यू, विचित्र घटनेने सगळेच हादरले; डॉक्टरांनी सांगितले नेमके कारण

SCROLL FOR NEXT