शिवसेना गटनेतेपदी मनोज हळदणकर
वाशी, ता. २२ (बातमीदार) ः नवी मुंबई महापालिकेत शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या गटनेतेपदी माजी विरोधी पक्षनेते मनोज हळदणकर यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे एकूण ४२ नगरसेवक गटस्थापनेच्या प्रक्रियेसाठी कोकण भवन येथील आयुक्तांकडे उपस्थित होते. या प्रक्रियेदरम्यान गटनेतेपदाबाबत शिवसेनेने कमालीची गुप्तता पाळल्याचे पाहायला मिळाले.
नवी मुंबई महापालिका निवडणुकीनंतर आता महापौरपदाच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याआधी विविध राजकीय पक्षांमध्ये गटनेते कोण असणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. शिवसेना (शिंदे गट)ने गटनेता जाहीर केल्यानंतर आता भाजपसह अन्य प्रमुख पक्षांच्या निर्णयाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले गेले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.