मुंबई

भाजप प्रमुख घटक पक्ष पद वाटपात योग्य सन्मान राखावा - आमदार निरंजन डावखरे

CD

मित्रपक्षाने याेग्य सन्मान द्यावा!
भाजप आमदार निरंजन डावखरे यांची अपेक्षा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २३ : ठाणे महापालिका निवडणुकीत भाजपने मुसंडी मारली आहे. मागच्या तुलनेत पाच अधिकच्या जागांवर विजय मिळवत २८ जागांपर्यंत मजल मारली आहे. महापौरपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर महापौरपद मिळावे, अशी मागणी पक्षाने लावून धरली आहे. शुक्रवारी नवनिर्वाचित नगरसेवकांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. सत्तेतील मित्रपक्षाने भाजपला योग्य तो सन्मान द्यावा. तसेच भाजप हा महापालिकेतील प्रमुख घटक पक्ष असून, त्यानुसार पदवाटप अपेक्षित असल्याची मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी या वेळी केली आहे.
ठाण्यातील वर्तकनगरमधील पक्षाच्या मुख्य कार्यालयात शुक्रवारी (ता. २३) ही बैठक झाली. यात जिल्हाध्यक्ष संदीप लेले, आमदार निरंजन डावखरे, प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक आदी उपस्थित होते. या बैठकीत महापालिकेतील भाजपच्या गटनेतेपदासंदर्भात चर्चा करण्यात आली. या वेळी आमदार निरंजन डावखरे यांनी येत्या २७ जानेवारीला भाजपच्या गटनेत्याची घोषणा करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच गटनेतेपदासाठी अनुभवी नगरसेवकांसोबतच पहिल्यांदाच निवडून आलेल्या नगरसेवकांचाही विचार होऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले. भाजपकडून अनुसूचित जाती प्रवर्गातील नगरसेवक निवडून आले असून, सुरेश कांबळे आणि उषा वाघ यांचाही पदवाटपात विचार करण्यात यावा, असे आमदार निरंजन डावखरे यांनी सांगितले.

महत्त्वाच्या पदावर दावा
जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांनी महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष आणि सभागृह नेते ही सर्व महत्त्वाची पदे भाजपकडेच असावीत. यासाठी पक्षाकडून ठाम भूमिका मांडण्यात आल्याचे प्रसारमाध्यमांना सांगितले. तसेच महापालिकेतील प्रभाग समित्या, परिवहन समिती आणि शिक्षण मंडळामध्ये भाजपचा सहभाग असावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Death News LIVE Updates : अजित पवार यांचे पार्थिव काटेवाडीकडे रवाना

Ajit Pawar Death: आभार मानायचे राहिले… पुण्यासाठी घेतलेला दादांचा तो निर्णय ठरला अखेरचा

Ajit Pawar Passed Away: अलविदा दादा ! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आज बारामतीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, राज्यात शोकाकूल वातावरण

Ajit Pawar Death: कामाचा माणूस गेला; सोलापूरकर भावुक, साेलापुतील चौकाचौकांत उभारले बॅनर!

Minister Mkarand Patil: महाराष्ट्राच्या कामाचा माणूस...

SCROLL FOR NEXT