मुंबई

बदलापूर प्रकरणात शिक्षण विभागाला उपमुख्यमंत्र्यांचे फटकार; प्री-स्कूलवर कडक कारवाईचे संकेत!

CD

प्री-स्कूल शासनाच्या अखत्यारीत येणार!
उपनगराध्यक्षा दामले, चेंदवणकर यांनी अजित पवारांची घेतली भेट
बदलापूर, ता. २४ (बातमीदार) ः प्री-प्रायमरी अर्थात पूर्व प्राथमिक शाळांबाबत राज्य सरकारने शनिवारी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे लहान मुलांची सुरक्षितता, शिक्षणाची गुणवत्ता आणि शिस्तबद्ध व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे. तर प्री-स्कूल महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाच्या अखत्यारीत घेण्यासंदर्भात लवकरच परिपत्रक काढण्यात येणार आहे.
या निर्णयासाठी बदलापूरच्या उपनगराध्यक्ष प्रियांका आशीष दामले आणि संगीता चेंदवणकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन या विषयाचा पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे बदलापूरमधील पालक व नागरिकांच्या भावना शासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचवल्या. स्थानिक पातळीवरील गंभीर प्रश्न शासनाच्या निदर्शनास आणून देत त्यांनी लहान मुलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा मांडल्याने शासनाकडून ठोस निर्णय घेण्यात आला. बदलापूर पालिकेच्या उपनगराध्यक्ष प्रियंका दामले व संगीता चेंदवणकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन, संपूर्ण प्रकरणाची माहिती त्यांना दिली.

शिक्षण विभागाला फटकारले
प्री स्कूल शिक्षण विभागाच्या अंतर्गत येत नसल्याचे त्यांनी सांगताच, तातडीने अशा समस्यांवर तोडगा काढण्यासाठी तत्पर असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बदलापूरमधील प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाला चांगलेच फटकारले. कोणत्याही परवानगीशिवाय प्री-स्कूल कशा उभारल्या जातात, याची कसून चौकशी करून सर्व शाळांची शिक्षण विभागामार्फत नोंदणी करावी. तसेच मार्गदर्शक सूचना देत चिमुकल्यांच्या सुरक्षेसाठी तातडीने ठोस पावले उचलावीत, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.

लवकरच परिपत्रक
यानंतर प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी प्री-स्कूल महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाच्या अखत्यारीत घेण्यासंदर्भात लवकरच परिपत्रक काढण्यात येईल, अशी माहिती दिली आहे. त्यामुळे ही भेट बदलापूरच्या सध्या असलेल्या ज्वलंत प्रश्नासाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Prices : इराण-अमेरिका युद्धाचा थेट फटका! गॅस सिलिंडर महाग; आजपासून नवे दर लागू, किती झाली किंमत?

अग्रलेख : उजेडातील रोषणाई!

मोठी बातमी! पहिली ते नववीची अंतिम सत्र परीक्षा २० एप्रिलपासून; शिक्षक-विद्यार्थ्यांना ४४ दिवसांची उन्हाळा सुट्टी; १५ जूनपासून सुरु होणार शाळा

Weekend Special Recipe: नवीन काहीतरी खायचंय? मग वीकेंडला बनवा चविष्ट मुगदाळीची बाटी, सोपी आहे रेसिपी

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : ७ मार्च २०२६ ते १३ मार्च २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT