मुंबई

जिल्हा परिषद शाळा रोडे येथे कौशल्यधिष्ठित उपक्रम

CD

जिल्हा परिषद शाळा रोडे येथे कौशल्याधिष्ठित उपक्रम
अलिबाग, ता. २७ (वार्ताहर) : तेजस्विनी सामाजिक व सांस्कृतिक फाउंडेशन, रायगड शाखा गडबतर्फे रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रोडे येथे विद्यार्थ्यांसाठी कौशल्याधिष्ठित उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. संस्थापिका जीविता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फनी गेम्स व विविध स्पर्धांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमात शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्यात आल्या, तर विविध स्पर्धांतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी तेजस्विनी फाउंडेशनचे अध्यक्ष भावनेश मोकल, शिक्षक जयश्री म्हात्रे, सविता राऊत, संगीता पाटील, रेश्मा अंबाडे व विशाल मोरे यांनी विशेष परिश्रम घेतले. मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे तसेच हसत-खेळत शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षणातील उत्साह वाढावा, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे अध्यक्ष भावनेश मोकल यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dubai Airport Drone Attack : दुबई विमानतळावर इराणचा ड्रोन हल्ला ! आकाशात धुराचे लोट, विमानसेवा विस्कळीत

Sambhajinagar Hostel Mess 'Mess': CIPET वसतिगृहात धक्कादायक प्रकार: विद्यार्थ्यांच्या जेवणात अळ्या-मुंगळे; महिनाभरात दहा वेळा घटना

Sambhajinagar News: शहीद सैनिकांच्या मुलांसाठी आनंदाची बातमी: MGM विद्यापीठात 100% मोफत शिक्षणासाठी भारतीय सैन्यदलासोबत करार

Sambhajinagar LPG News: गॅस तुटवड्यावर ‘सकाळ’चा दणका: बुढीलेनमध्ये हॉटेलवर छापा, घरगुती तीन सिलिंडर जप्त

मोठी बातमी! लाडक्या बहिणींना एप्रिलमध्ये मिळणार ३००० रुपये; ‘ई-केवायसी’साठी ३१ मार्चपर्यंत मुदत, पडताळणीचा अहवाल शासनाला सादर, वाचा...

SCROLL FOR NEXT