मुंबई

नामोनिशाण मिटवायची परवानगी द्याच

CD

नामोनिशाण मिटवायची परवानगी द्याच!
- भाजप प्रदेशाध्यक्षांना खासदार नरेश म्हस्के यांचे पत्र
- भाई विरुद्ध दादाचा वाद चिघळणार
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २७ : भाजपने परवानगी दिली तर शिवसेनेचे नामोनिशाण मिटवून टाकू, अशी भाषा करणाऱ्या वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्याविरोधात शिवसेना शिंदे गट आक्रमक झाला आहे. या पार्श्वभूमीवर खासदार नरेश म्हस्के यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना थेट पत्र लिहून ‘नाईक यांना शिवसेना संपवण्याची परवानगी द्यावीच,’ असे खुले आव्हान दिले आहे. त्यामुळे नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात ‘भाई विरुद्ध दादा’ असा राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
माघी गणेशोत्सवानिमित्त रविवारी वनमंत्री गणेश नाईक ठाण्यात आले होते. या वेळी माध्यमांसोबत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कुठेही नाव न घेता नाईक यांनी शिवसेना शिंदे गटावर टीका केली होती. तसेच भाजपने परवानगी दिली तर त्यांचे नामोनिशान मिटून टाकीन, अशी भाषा वापरली होती. त्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार नरेश मस्के यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना पत्र पाठवले आहे. पत्रात म्हस्के यांनी नमूद केले आहे, की राज्यात आणि अनेक महापालिकांमध्ये भाजप-शिवसेना युती सत्तेत असताना, युतीतीलच एका घटक पक्षाचे अस्तित्व संपवण्याची भाषा करणे हे केवळ आघाडी धर्माच्या विरोधातच नव्हे, तर पक्ष नेतृत्वावर अविश्वास दाखवणारे आहे. एखाद्या व्यक्तीविरोधातील राजकीय मतभेद समजू शकतात; मात्र त्यासाठी संपूर्ण पक्ष आणि त्याचा अजेंडा नाकारण्याची भूमिका स्वीकारणे योग्य नाही, असा टोला त्यांनी नाईक यांना लगावला.

अस्वस्थता वाढलेली आहे
नरेश म्हस्के यांनी दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांचा संदर्भ देत नवी मुंबईत गणेश नाईक यांना पूर्वी शिवसेनेने कशी जोरदार टक्कर दिली होती याची आठवण करून दिली. ‘‘आज शिवसेना नवी मुंबईत संपली आहे, असे दावे करणाऱ्यांना आम्ही प्रत्यक्ष निवडणुकीत ४२ जागा जिंकून उत्तर दिले आहे. त्यामुळेच कदाचित काही नेत्यांची अस्वस्थता वाढलेली आहे,’’ असेही त्यांनी पत्रात स्पष्ट केले.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात स्थिर सरकार कार्यरत असताना, अशा प्रकारची विधाने युतीतील तणाव वाढवणारी ठरत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. नाईक यांच्या वक्तव्यावर भाजप नेतृत्व कोणती भूमिका घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी महापालिका राजकारणात या वादाचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कागदपत्रे द्या किंवा जागा खाली करा...; एसआरएने धारावी पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांना अंतिम नोटीस बजावली, किती दिवसांची?

मी त्याचा बाप आहे... व्हायरल व्हिडीओमुळे होणाऱ्या टीकेवरून आस्ताद काळेचे वडील संतापले; म्हणाले- माजोरडा आहे म्हणता मग...

25 मार्चपासून 'या' राशींचा गोल्डन टाईम सुरू ! राजासारखं जगणार आयुष्य ; पैसा, गाडी, करियर सगळ्यात होणार प्रगती

आधी तुकड्यांमध्ये शरीराचे अवयव, नंतर संपूर्ण सांगाड्यासारखे शरीर आढळले; महामार्गावर मुरूम टाकताना धक्कादायक प्रकार समोर

Gudi Padwa Special Sugar-Free Dates Shrikhand: गुढी पाडव्याला मधुमेहीदेखील खाऊ शकतील श्रीखंड; खजूर श्रीखंडाची रेसिपी लगेच वाचा

SCROLL FOR NEXT