मुंबई

गट नोंदणीनंतर महायुतीची समित्यांची कोंडी सुटणार

CD

गट नोंदणीनंतर समित्यांची कोंडी सुटणार
महायुतीची एकत्र नोंदणी; व्हीप पालन बंधनकारक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : मुंबई महापालिकेतील वैधानिक आणि विशेष समित्यांमध्ये निर्माण झालेली कोंडी आता सुटणार आहे. विरोधी पक्षांच्या नगरसेवकांची संख्या समान म्हणजेच ८-८ इतकी होत असली, तरी स्थायी समिती अध्यक्षांना निर्णायक मताचा अधिकार असल्याने सत्ताधारी पक्षाला एक मताधिक्य मिळणार आहे. दरम्यान, येत्या गुरुवारी भाजप व शिवसेना शिंदे गट कोकण भवनला एकत्रित नोंदणी करणार आहे. या गटनोंदणीनंतर महापौर निवडणूक आणि विविध समित्यांमधील चित्र स्पष्ट होणार आहे; मात्र व्हीप बंधनकारक राहणार आहे.
निवडून आल्यानंतर प्रत्येक पक्षाला आपल्या पक्षाची गटनोंदणी कोकण भवनला जाऊन करावी लागते. नोंदणी झाल्यानंतर मिळालेले पत्र पालिकेच्य़ा चिटणीस विभागाला सादर करून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी लागते. आतापर्यंत काँग्रेस, एमआयएम, मनसे, सपाच्या दोन नगरसेवकांपैकी एका नगरसेवकांनी नोंदणी केली. तसेच शिवसेना ठाकरे पक्षानेही नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली आहे; मात्र अजूनही भाजप, शिवसेना शिंदे गटाने नोंदणी केली नसल्याने महापौर निवडणुकीची तारीख ठरलेली नाही. आता दोन्ही पक्ष महायुती म्हणून एकत्र नोंदणी करणार आहे. त्यानुसार शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांना भाजपच्या व्हीपचे पालन करणे अनिवार्य राहणार आहे. एखाद्या नगरसेवकाने व्हीपच्या विरोधात जाऊन मतदान किंवा निर्णय घेतला, तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. तक्रार दाखल झाल्यानंतर पालिका आयुक्तांना संबंधित नगरसेवकांच्या निलंबनाचा अधिकार आहे. मात्र, तक्रार दाखल न झाल्यास कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
.............
समित्यांमधील तांत्रिक अडचणी लक्षात घेता भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने एकत्रित कोकण आयुक्तांकडे नोंदणी करण्याचा निर्णय घेतला आहे. महायुतीच्या नावाने नोंदणी केल्याने सर्व प्रश्न सुटतील.
- राहुल शेवाळे, माजी खासदार, शिवसेना शिंदे गट
.............
ठाकरे गट आयुक्तांच्या भेटीला
शिवसेना ठाकरे गटाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी गटनेत्या किशोरी पेडणेकर यांच्या नेतृत्वात पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची सदिच्छा भेट घेतली. त्यापूर्वी त्यांनी पालिका चिटणीस यांच्याकडे पक्षाच्या सर्व नगरसेवकांची नोंदणी केली. पालिकेत आमची सत्ता होती, तेव्हा केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार सत्तेत होते. त्यामुळे आम्हाला त्यांच्याशी संघर्ष करावा लागला. आम्ही आता पालिकेत विरोधी पक्षात बसणार आहोत. त्यामुळे आताही आम्ही त्यांच्याशी संघर्ष करीत राहू, असे पेडणेकर म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘या’ शेतकऱ्यांना नाही कर्जमाफीचा लाभ! ३० सप्टेंबर २०२५ पूर्वीचे थकबाकीदार शेतकऱ्यांनाच दोन लाखांची पीक कर्जमाफी, वाचा...

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ जाहीर! राज्यात काय स्वस्त झालं, कोणत्या गोष्टी महागल्या? संपूर्ण यादी जाणून घ्या...

Iran-Israel War: दुबईकडे केवळ १० दिवस पुरेल एवढाच अन्नसाठा; फळही नाहीत अन् भाज्यांचाही तुटवडा

Pune News: ''पुण्यातील बाजारपेठ शहराबाहेर स्थलांतरित...'', केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मोठं विधान

Baramati News : बारामती तालुक्याला वरदान ठरणाऱ्या नीरा कऱ्हा उपसा सिंचन योजनेला राज्य शासनाची मान्यता....

SCROLL FOR NEXT