मुंबई

खड्डेमुक्त मिरा-भाईंदर कागदावर

CD

खड्डेमुक्त मिरा-भाईंदर कागदावर
काँक्रीटचे रस्ते पुन्हा बांधणार, आयुक्तांचे आदेश
भाईंदर, ता. २८ (बातमीदार) : मिरा-भाईंदर खड्डेमुक्त करण्यासाठी शहरातील रस्ते काँक्रीटचे बनवण्याचे काम सुरू आहे. मात्र, नव्याने तयार केलेल्या रस्त्यांनाच तडे गेल्याने महापालिका आयुक्तांनी रस्ता तोडून पुन्हा बनवण्याचे आदेश कंत्राटदाराला दिले आहेत.
पावसाळ्यात मिरा-भाईंदर शहरातील डांबरी रस्त्यांना मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. यासाठी शहरातील सर्व रस्ते काँक्रीटचे करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी १२०० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. काही रस्ते महापालिका स्वतः बांधत आहे, तर काही रस्ते एमएमआरडीए स्वःखर्चाने बांधले आहेत. मिरा रोड येथील प्लेझंट पार्क भागात काँक्रीट रस्त्याचे काम पूर्ण करण्या आले. मात्र, नव्याने बांधलेल्या रस्त्याला काही दिवसांतच तडे गेले आहेत. याबाबत एमएमआरडीए, पालिकेकडे तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी स्वतः रस्त्याची पाहणी करताना संबंधित कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
----------------------
महिनाभरातील तिसरी घटना
काँक्रीटच्या रस्त्याला तडे गेल्याने पुन्हा बांधण्याची ही तिसरी घटना आहे. विकासकामे सुरू असताना त्यांच्या दर्जावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी पालिकेच्या कनिष्ठ अभियंत्यावर असते. मात्र, त्यानंतरही कामे निकृष्ट दर्जाचे होत असल्याने अभियंत्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
-----------------------------
विकासकामांची गुणवत्ता राखण्यावर कटाक्षाने लक्ष दिले जात आहे. अन्य विकासकामांची गुणवत्ता तपासली जात आहे.
- राधाबिनोद शर्मा, आयुक्त, मिरा-भाईंदर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: प्रेयसीचा मॅसेज आला अन् भेटायला गेला …; काही तासांतच आईला फोन, प्रेमसंबंधातून तरूणाला संपवलं, कोथरूडमध्ये काय घडलं?

LPG गॅस कमतरतेच्या अफवा वाढल्या अन् प्ले स्टोअरवर झाला धूमाकुळ; नंबर 1 डाउनलोडवर पोहोचले 'हे' ॲप, जाणून घ्या का वाढली डिमांड

पश्चिम बंगाल, तामिळनाडू अन् आसामसह पाच राज्यात वाजवणार बिगुल, केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद...

अरे व्वा! अनुष्का शेट्टी लवकरच करणार लग्न? वयाच्या 44 व्या वर्षी व्यावसायिकासोबत बांधणार लग्नगाठ?

Rasgulla Choking Death : लग्नात जेवताना घशात रसगुल्ला अडकल्याने मृत्यू, विचित्र घटनेने सगळेच हादरले; डॉक्टरांनी सांगितले नेमके कारण

SCROLL FOR NEXT