नवी मुंबई (वार्ताहर) : ठाणे येथून देवदर्शन करून कोपरखैरणे येथे स्कुटीवरून परतणाऱ्या दोघा भावांना भरधाव ट्रकने धडक दिली. या अपघातात स्कुटीचालक तरुण ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता. २७) दुपारी ठाणे-बेलापूर मार्गावर रबाळे येथे घडली. रबाळे एमआयडीसी पोलिसांनी ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करून कनवारराम बिष्णोई याला ताब्यात घेतले आहे.
देवांग रमेश वाविया (वय १८) आणि मित रमेश वाविया (वय १६) हे दोघेही कोपरखैरणे सेक्टर-३ मध्ये राहण्यास होते. देवांगने शिक्षण पूर्ण केल्यानंतर नुकताच तो कामाला लागला होता, तर मित हा सध्या शिक्षण घेत आहे. हे दोघे भाऊ प्रत्येक मंगळवारी ठाणे येथील आशापुरा मंदिरात दर्शनासाठी जात होते. मंगळवारीही हे दोघे भाऊ आशापुरा मंदिरात दर्शनासाठी स्कूटीवरुन गेले होते. दर्शन घेऊन ते ठाणे-बेलापूर मार्गावरुन कोपरखैरणे येथे परतत होते. सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास त्यांची स्कुटी रबाळे येथील महाजन हॉस्पिटलजवळ आली असता, उजव्या बाजूने जाणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांच्या स्कुटीला धडक दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.