मुंबई

राज्यभर विशेष सर्वेक्षण राबवणार

CD

कुष्ठमुक्तीसाठी ‘कुसुम’ मोहीम
राज्यभर ‘आशा’च्या माध्यमातून विशेष सर्वेक्षण

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : शाश्वत विकास ध्येयांतर्गत २०२७पर्यंत शून्य कुष्ठरोग प्रसाराचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राज्यात ‘कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र (कुसुम)’ ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी या कालावधीत संपूर्ण राज्यात ही मोहीम राबविली जाणार असून, नियमित सर्वेक्षणातून वंचित राहणाऱ्या दुर्लक्षित आणि उपेक्षित घटकांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी ‘आशा’ कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.
कुष्ठरोगाचा प्रसार रोखण्यासाठी समाजातील लपलेले रुग्ण वेळेत शोधून त्यांना बहुविध औषधोपचाराखाली आणणे आवश्यक असल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. मात्र, वीटभट्टी कामगार, खाण कामगार, बांधकाम मजूर, स्थलांतरित व्यक्ती, कारागृहातील बंदी, आश्रमशाळा व वसतिगृहांतील विद्यार्थी तसेच कारखान्यांतील कामगार हे घटक नियमित सर्वेक्षणाच्या वेळी घरी उपलब्ध नसल्याने तपासणीपासून वंचित राहतात. ही बाब लक्षात घेऊन ‘कुसुम’ मोहिमेंतर्गत या घटकांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचण्यासाठी हे सर्वेक्षण राबविण्यावर भर देण्यात आला आहे. या मोहिमेसाठी जिल्हा, तालुका आणि प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर सूक्ष्म कृती आराखडे तयार करण्यात येणार असून, आशा व पुरुष स्वयंसेवकांच्या मदतीने प्रत्यक्ष क्षेत्रीय सर्वेक्षण केले जाणार आहे. संशयित रुग्णांची तातडीने तपासणी करून निदान व उपचार सुरू करण्यात येणार असून, संसर्गाची साखळी खंडित करण्यावर विशेष लक्ष दिले जाणार आहे. यासोबतच रुग्णांच्या सहवासितांची तपासणी करून पात्र व्यक्तींना प्रतिबंधात्मक औषधोपचार देण्यात येणार आहे.
...
व्यापक जनजागृती
कुष्ठरोगाबाबत समाजात अद्याप असलेली भीती, गैरसमज आणि भेदभाव दूर करण्यासाठी मोहिमेदरम्यान व्यापक जनजागृती उपक्रम राबविले जाणार आहेत. रोगाच्या प्राथमिक अवस्थेत निदान झाल्यास विकृती टाळता येते आणि रुग्णांचे सामाजिक पुनर्वसन सुलभ होते, हा संदेश विविध माध्यमांतून समाजापर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.
...
महत्त्वाचे पाऊल
मोहिमेचा दैनंदिन अहवाल गुगल शीटद्वारे राज्य स्तरावर सादर करण्यात येणार असून, त्याचे विश्लेषण करून आवश्यक ती पुढील कार्यवाही केली जाणार आहे. ‘कुसुम’ मोहीम ‘आशा’च्या माध्यमातून प्रभावीपणे राबविल्यास कुष्ठमुक्त आणि सुरक्षित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले जाईल, असे सार्वजनिक आरोग्य विभागाने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘या’ शेतकऱ्यांना नाही कर्जमाफीचा लाभ! ३० सप्टेंबर २०२५ पूर्वीचे थकबाकीदार शेतकऱ्यांनाच दोन लाखांची पीक कर्जमाफी, वाचा...

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ जाहीर! राज्यात काय स्वस्त झालं, कोणत्या गोष्टी महागल्या? संपूर्ण यादी जाणून घ्या...

Iran-Israel War: दुबईकडे केवळ १० दिवस पुरेल एवढाच अन्नसाठा; फळही नाहीत अन् भाज्यांचाही तुटवडा

Pune News: ''पुण्यातील बाजारपेठ शहराबाहेर स्थलांतरित...'', केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मोठं विधान

Baramati News : बारामती तालुक्याला वरदान ठरणाऱ्या नीरा कऱ्हा उपसा सिंचन योजनेला राज्य शासनाची मान्यता....

SCROLL FOR NEXT