मुंबई

पादचाऱ्यांचा जीव धोक्यात

CD

पादचाऱ्यांचा जीव धोक्यात
बोईसर-तारापूर मार्गावर दुकानांचे अतिक्रमण
बोईसर, ता. २ (वार्ताहर) ः तारापूर औद्योगिक वसाहतीतील वर्दळीच्या मुख्य मार्गावर मोठ्या प्रमाणात विनापरवाना शेड, अतिक्रमणे केली जात आहेत. त्यामुळे हा रस्ता दिवसेंदिवस अरुंद होत चालला असून भरधाव वाहनांमुळे पादचाऱ्यांचे जीव धोक्यात आले आहेत.
या मार्गालगत असलेल्या वाहन शोरूममुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. शोरूमकडून मोठ्या ट्रेलरमधून गाड्या तासन्‌तास रस्त्याच्या कडेला उभ्या केल्या जातात. विशेष म्हणजे, कोणतीही पूर्वसूचना, वाहतूक नियंत्रण अथवा सुरक्षेची खबरदारीशिवाय ट्रेलरची वाहतूक केली जाते. दुचाकीस्वार, पादचारी, लहान वाहनचालक थेट धोक्यात येतात. याचबरोबर काही शोरूमवाले विक्रीसाठी शोरूमच्या बाहेरच रस्त्यालगत अनधिकृत शेड टाकून गाड्या उभ्या करीत आहेत. रस्त्याचा वापर वाहने उभी केली जात आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी अपघातांचा धोका वाढला आहे.
-------------------------------
दुर्घटनेची भीती
- काही महिन्यांपूर्वी दुचाकीवरून पडून एका लहान मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच एका कारला कंटेनरने धडक दिली होती. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र वित्तहानीबरोबर काही काळ वाहतूक विस्कळित झाली होती.
- बेकायदा अतिक्रमणे हटवणे, ट्रेलर, अवजड वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था तसेच वाहतूक पोलिसांनी नियमित गस्त वाढवावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे, अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway Traffic Jam: मुंबई-पुणे ‘द्रुतगती महामार्गा’वर गॅस टँकर उलटला!, मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प

WPL 2026: जेमिमाहची दिल्ली कॅपिटल्स सलग चौथ्यांदा फायनलमध्ये, गुजरातचा केला पराभव; जेतेपदासाठी RCB शी लढणार

Mumbai Airport incident : मुंबई एअरपोर्टवर भीषण विमान दुर्घटना टळली! ; एअर इंडिया अन् इंडिगो विमानांची पंख एकमेकांना धडकली

मोठी बातमी! ‘टीईटी’त साडेचार लाखातील चार लाख भावी शिक्षक नापास; मराठीचा १२ टक्के तर इंग्रजीचा निकाल ५.४४ टक्के, ३६ जणांचा निकाल ठेवला राखून, वाचा...

Pune Traffic : जेधे चौकात जीव धोक्यात! अतिक्रमण, बेशिस्त वाहनचालकांमुळे पादचाऱ्यांची रोजची कसरत

SCROLL FOR NEXT