पारितोषिक वितरण समारंभ
बोर्डी, (बातमीदार) : बोरिगाव येथील आचार्य भिसे शिक्षण संस्थेच्या व. का. लाखाणी माध्यमिक विद्यालयात, वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून बॉम्बे चार्टर्ड अकाउंटंट सोसायटी फाउंडेशनचे विश्वस्त डॉ. सीए. मयूर बी. नायक व बॉम्बे चार्टर्ड अकाउंटंट सोसायटी मुंबईचे सदस्य सीए. किशोर राणे उपस्थित होते. समारंभाचे अध्यक्षस्थान विजय म्हात्रे, अध्यक्ष शिक्षण संस्था बोर्डी यांनी भूषविले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलानाने झाली. शाळेच्या मुख्याध्यापिका पौर्णिमा राऊत यांनी प्रास्ताविक सादर केले. विविध शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके, प्रमाणपत्रे देऊन गौरवण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे सर्व सरातून कौतुक करण्यात आले. प्रमुख अतिथींनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना शिस्त व स्वच्छता यांचे महत्त्व लक्षात घ्यावे व पंचामृताप्रमाणे आपले जीवन असावे असे सांगितले. शाळेचे पर्यवेक्षक मनीष जोंधळेकर यांनी आभार प्रदर्शन केले. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी समारंभाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुजिता बारी व अंकिता राऊत यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.