मुंबई

मुलाच्या हत्येप्रकरणी वडिलांना जन्मठेप

CD

मुलाच्या हत्येप्रकरणी वडिलांना जन्मठेप
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १ : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन संतापाच्या भरात झोपेत असलेल्या पत्नी व चार अल्पवयीन मुलांवर धारदार शस्त्राने हल्ला करणाऱ्या पित्याला कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या हल्ल्यात नऊ वर्षांचा मुलगा प्रणव ऊर्फ देवेश सुनील पाताडे याचा जागीच मृत्यू झाला होता. साडेबारा वर्षांनंतर हा निकाल लागला आहे.

कल्याण पश्चिमेतील रामबाग, गल्ली क्रमांक चार येथील स्वानंद कॉलनीत मार्च २०१३मध्ये मध्यरात्री ही धक्कादायक घटना घडली होती. आरोपी सुनील सदाशिव पाताडे (वय ४६) याने पत्नी मीना आणि झोपेत असलेल्या मुलांवर धारदार पात्याने हल्ला केला. या हल्ल्यात प्रणवचा मृत्यू झाला, तर पत्नी मीना तसेच सुजित, शुभम (५) आणि सर्वेश (अडीच) हे तिघे गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणाचा निकाल तब्बल साडेबारा वर्षांनंतर लागला. जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. एस. इनामदार यांनी आरोपी सुनील पाताडे याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून, पाच हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. दंड न भरल्यास तीन महिन्यांची अतिरिक्त शिक्षा भोगावी लागणार आहे.
या घटनेनंतर महात्मा फुले पोलिस ठाण्यात गंभीर जखमी पत्नीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक बळीरामसिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक एस. के. धनवडे यांनी तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील ॲड. संजय गोसावी व ॲड. जयश्री भटेजा यांनी ठोस पुरावे, पंचनामे आणि साक्षीदारांच्या आधारे आरोपीचा गुन्हा सिद्ध केला. बचाव पक्षाने प्रत्यक्ष साक्षीदार नसल्याचा मुद्दा उपस्थित केला असला, तरी न्यायालयाने एकूण घटनाक्रम व सबळ पुराव्यांचा सखोल विचार करून आरोपीच या घटनेस जबाबदार असल्याचा ठपका ठेवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘या’ शेतकऱ्यांना नाही कर्जमाफीचा लाभ! ३० सप्टेंबर २०२५ पूर्वीचे थकबाकीदार शेतकऱ्यांनाच दोन लाखांची पीक कर्जमाफी, वाचा...

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ जाहीर! राज्यात काय स्वस्त झालं, कोणत्या गोष्टी महागल्या? संपूर्ण यादी जाणून घ्या...

Iran-Israel War: दुबईकडे केवळ १० दिवस पुरेल एवढाच अन्नसाठा; फळही नाहीत अन् भाज्यांचाही तुटवडा

Pune News: ''पुण्यातील बाजारपेठ शहराबाहेर स्थलांतरित...'', केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मोठं विधान

Baramati News : बारामती तालुक्याला वरदान ठरणाऱ्या नीरा कऱ्हा उपसा सिंचन योजनेला राज्य शासनाची मान्यता....

SCROLL FOR NEXT