मुंबई

अर्थसंकल्पात पर्यटन विकासाला चालना

CD

अर्थसंकल्पात पर्यटन विकासाला चालना
शंभूराज देसाई ः कौशल्य विकास, रोजगार निर्मितीवर भर
मुंबई, ता. १ : केंद्रीय अर्थसंकल्पात देशाच्या पर्यटनाला चालना देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यंदाचा अर्थसंकल्प लोककल्याण, पर्यटनातून रोजगार निर्मिती, सर्वसमावेशक आर्थिक सुधारणांवर भर देणारा अर्थसंकल्प आहे, अशी पर्यटन प्रतिक्रिया मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
नॅशनल कौन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजीचे (एनसीएचएमसीटी) उन्नतीकरण करून नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हॉस्पिटॅलिटीची स्थापना करण्यात येणार आहे. २० पर्यटनस्थळांवरील १० हजार मार्गदर्शकांचा कौशल्य विकास करण्यासाठी प्रमाणित, उच्च दर्जाच्या १२ आठवड्यांचा प्रशिक्षण अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहे. देशातील महत्त्वाची १५ पुरातत्त्व स्थळे विकसित करून त्यांना सजीव, अनुभवाधारित सांस्कृतिक पर्यटन केंद्रे म्हणून उभारण्यात येणार आहे. जीएसटी सुलभीकरण सीमा शुल्क व इतर अप्रत्यक्ष कर तसेच थेट कर प्रणाली या क्षेत्रात महत्त्वपूर्ण सुधारणा राबवण्यात आल्या असल्याचे देसाई यांनी सांगितले.
----
पर्यटनात भारत सक्षम होईल
अर्थसंकल्पात पर्यटन विकासावर भर दिला आहे. व्यावसायिक पर्यटनासोबतच आरोग्य पर्यटनातही रोजगार निर्मिती होणार आहे. त्यामुळे छोट्या उद्योगांसह पर्यटन क्षेत्रातही उद्योजकता वाढणार आहे. पर्यटन क्षेत्रातील मार्गदर्शक, टूर ऑपरेटर्स तसेच सर्व भागधारकांचे कौशल्य विकसित करण्यावर भर दिला आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांसाठी पर्यायी उत्पन्नाचे साधन म्हणून कृषी पर्यटन किंवा डेअरी, पोल्ट्री उद्योगासाठी वेगवेगळ्या योजना नियोजित केल्या आहेत, अशी प्रतिक्रिया पर्यटन विभागाचे संचालक डॉ. बी. एन. पाटील यांनी दिली.
---
शालेय सहलींसाठी सवलती हव्या
शालेय आणि वरिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीसाठी रेल्वे आरक्षणातील सवलत केंद्र सरकारने कमी केली. ती पुन्हा सुरू करावी, अशी मागणी एज्युकेशनल टूर ऑपरेटर्स असोसिएशनने केली होती. यंदाच्या अर्थसंकल्पातही त्याबाबत तरतूद केली नसल्याचे असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रशांत आंधळकर यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मे मध्ये धावणार; २३ किलोमीटरच्या मार्गिकेचे दोन टप्प्यांत उद्‍घाटन

Dharashiv Accident: तुळजापूर-लातूर महामार्गावर भीषण अपघात; तीन वाहनांची धडक, एक ठार

Latest Marathi Update : राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात पावसाची शक्यता

Chh. Sambhajinagar: रीलस्टारनं निवृत्त प्राध्यापकाला गोळ्या झाडून संपवलं, ४० दिवसांनी उघड; कच्च्या इंग्रजीमुळे सापडले, तिघांना अटक

Pune News : पुणे महापालिकेची टीडीआर प्रक्रिया झाली सोपी

SCROLL FOR NEXT