मुंबई

वाशी पोलिसांच्या सतर्कतेमुळे सायबर फसवणूक टळली

CD

नवी मुंबई, ता. २ (वार्ताहर) : ॲमेझॉन डिलिव्हरीच्या नावाखाली वाशीतील दाम्पत्याकडून तब्बल १५ लाख रुपये लुबाडण्याचा प्रयत्न सायबर चोरट्यांनी केला होता. मात्र, वाशी पोलिसांनी आपल्या तांत्रिक कौशल्याने हा प्रयत्न उधळून लावला आहे. कोणतीही आर्थिक हानी होऊ न देता वाशी पोलिसांना तक्रारदारांचे पैसे सुरक्षित ठेवण्यात यश आले आहे.

वाशीत राहणाऱ्या निशा सुवर्णा यांच्या बँक खात्यातून शनिवारी (ता. ३१) सकाळी १५ लाख रुपये वजा झाल्याचा मेसेज त्यांना प्राप्त झाला होता. त्यामुळे त्या पती रवी यांच्यासह घाबरलेल्या अवस्थेत वाशी पोलिस ठाण्यात दाखल झाल्या. त्यानंतर वाशी पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत निशा यांना ॲमेझॉन डिलिव्हरीच्या संदर्भात एका व्यक्तीने कॉल केला होता. त्याने त्यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या मोबाईलवर एक एपीके फाइल इन्स्टॉल करायला लावून त्यांच्या मोबाईलची क्रीन शेअर करण्यास प्रवृत्त केले होते. तसेच सायबर चोरट्यांनी सुवर्णा यांच्या खात्यातून पैसे काढून घेण्यासाठी त्यांना एक भ्रामक मेसेज पाठवून यांना घाबरवले होते.

वाशी पोलिस ठाण्यातील सायबर अंमलदार वाघमारे यांनी तत्काळ तांत्रिक तपासणी करत, बँकेशी संपर्क साधून खात्री केली असता, सुवर्णा यांच्या खात्यातून एकही रुपया वजा झाला नसल्याची खात्री केली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने सुवर्णा यांच्या मोबाईलमधील संशयित एपीके ॲप्लिकेशन काढून टाकले. वरिष्ठ निरीक्षक शशिकांत चांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पथकाने केलेल्या या त्वरित हस्तक्षेपामुळे सुवर्णा दाम्पत्याची फसवणूक टळली आहे.

क्रीन शेअरिंगचा प्रयत्न
प्रत्यक्षात त्यांच्या खात्यातून पैसे वजा झाले नव्हते. मात्र, हा मेसेज पाहून निशा यांनी खाते तपासण्यासाठी यूपीआय पिन टाकला असता, तर क्रीन शेअरिंगमुळे तो चोरला गेला असता आणि खरोखरच त्यांच्या खात्यातून १५ लाख रुपये लंपास झाले असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway Traffic Jam: मुंबई-पुणे ‘द्रुतगती महामार्गा’वर गॅस टँकर उलटला!, मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प

WPL 2026: जेमिमाहची दिल्ली कॅपिटल्स सलग चौथ्यांदा फायनलमध्ये, गुजरातचा केला पराभव; जेतेपदासाठी RCB शी लढणार

Mumbai Airport incident : मुंबई एअरपोर्टवर भीषण विमान दुर्घटना टळली! ; एअर इंडिया अन् इंडिगो विमानांची पंख एकमेकांना धडकली

मोठी बातमी! ‘टीईटी’त साडेचार लाखातील चार लाख भावी शिक्षक नापास; मराठीचा १२ टक्के तर इंग्रजीचा निकाल ५.४४ टक्के, ३६ जणांचा निकाल ठेवला राखून, वाचा...

Pune Traffic : जेधे चौकात जीव धोक्यात! अतिक्रमण, बेशिस्त वाहनचालकांमुळे पादचाऱ्यांची रोजची कसरत

SCROLL FOR NEXT