मुंबई

पारसिकनगरला पोलिस अधिकाऱ्याच्याच गळ्यातील सोनसाखळी हिसकावली

CD

पोलिस अधिकाऱ्याच्याच गळ्यातील सोनसाखळी लंपास
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २ : नेहमीप्रमाणे कुटुंबासोबत जेवण झाल्यानंतर फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडलेल्या एका पोलिस अधिकाऱ्याच्याच गळ्यातील सोनसाखळी हिसकावल्याची घटना घडली आहे. ही घटना कळवा पारसिकनगर येथे समोर आली आहे. या घटनेत एक लाखाची दोन तोळ्यांची सोनसाखळी चोरीला गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तक्रारदार एम. एस. भोसले पारसिकनगर येथे राहणारे असून, ते मुंब्रा पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षकपदावर कार्यरत आहे. भोसले हे शनिवारी (ता. ३१) नेहमीप्रमाणे रात्री कुटुंबासोबत जेवण झाल्यानंतर फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडले होते. ९० फूट रोड परिसरातून फेरफटका पूर्ण मारून कमल मेडिकलसमोर आले असता, पाठीमागून अचानक दुचाकीवरून आलेल्या दोन व्यक्तींनी भोसले यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावली आणि पसार झाले. परिसरात पुरेसा प्रकाश नसल्याने दुचाकीचा क्रमांक किंवा आरोपींची ओळख स्पष्टपणे पाहता आली नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, रात्रीच्या वेळी वाढलेल्या गुन्हेगारी घटनांवर आळा घालण्याची मागणी जोर धरत आहे. याप्रकरणी कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक उतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dubai Airport Drone Attack : दुबई विमानतळावर इराणचा ड्रोन हल्ला ! आकाशात धुराचे लोट, विमानसेवा विस्कळीत

Sambhajinagar Hostel Mess 'Mess': CIPET वसतिगृहात धक्कादायक प्रकार: विद्यार्थ्यांच्या जेवणात अळ्या-मुंगळे; महिनाभरात दहा वेळा घटना

Sambhajinagar News: शहीद सैनिकांच्या मुलांसाठी आनंदाची बातमी: MGM विद्यापीठात 100% मोफत शिक्षणासाठी भारतीय सैन्यदलासोबत करार

Sambhajinagar LPG News: गॅस तुटवड्यावर ‘सकाळ’चा दणका: बुढीलेनमध्ये हॉटेलवर छापा, घरगुती तीन सिलिंडर जप्त

मोठी बातमी! लाडक्या बहिणींना एप्रिलमध्ये मिळणार ३००० रुपये; ‘ई-केवायसी’साठी ३१ मार्चपर्यंत मुदत, पडताळणीचा अहवाल शासनाला सादर, वाचा...

SCROLL FOR NEXT