मुंबई

भरधाव आरएमसी ट्रकचा कहर!

CD

उल्हासनगरमध्ये आरएमसी ट्रकचा थरार
उभ्या रिक्षांना उडवले, चालक गंभीर
उल्हासनगर, ता. ३ (वार्ताहर) : उल्हासनगर कॅम्प-३ मधील फॉलोवर लाईन चौकात सोमवारी (ता. ३) रात्रीच्या सुमारास थरकाप उडवणारा अपघात घडला. भरधाव वेगाने आलेल्या आरएमसी ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन रिक्षांना जोरदार धडक दिली. या अपघातात एका रिक्षाचालकाला गंभीर दुखापत झाली असून एका रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे.
माहितीनुसार, आरएमसी ट्रक (क्रमांक एमएच ०५ जीए ५००८) हा नेहरू चौकाच्या दिशेने वेगाने येत होता. फॉलोवर लाईन चौकात येताच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन रिक्षांना ट्रकने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाले, तर एक रिक्षा चालक गंभीर जखमी झाला.अपघातानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. जखमीला तातडीने नागरिकांनी उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताचा पंचनामा करण्यात आला आहे. फरार ट्रक चालकाचा शोध सुरू असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात आहेत. दरम्यान, या अपघातामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मे मध्ये धावणार; २३ किलोमीटरच्या मार्गिकेचे दोन टप्प्यांत उद्‍घाटन

Dharashiv Accident: तुळजापूर-लातूर महामार्गावर भीषण अपघात; तीन वाहनांची धडक, एक ठार

Latest Marathi Update : राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात पावसाची शक्यता

Chh. Sambhajinagar: रीलस्टारनं निवृत्त प्राध्यापकाला गोळ्या झाडून संपवलं, ४० दिवसांनी उघड; कच्च्या इंग्रजीमुळे सापडले, तिघांना अटक

Pune News : पुणे महापालिकेची टीडीआर प्रक्रिया झाली सोपी

SCROLL FOR NEXT