मुंबई

मुलुंड मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

CD

मुलुंड मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुलुंड, ता. ३ (बातमीदार) ः आशिहारा कराटे इंटरनॅशनलच्या वतीने आयोजित मुलुंड मॅरेथॉन स्पर्धा उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली. आरोग्य, तंदुरुस्ती व क्रीडा संस्कृतीचा प्रसार करण्याच्या उद्देशाने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या या मॅरेथॉनला यंदाही सर्व वयोगटांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, कराटे प्रशिक्षणार्थी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
एक, तीन व पाच किलोमीटर अशा तीन अंतरांच्या गटांत ही स्पर्धा घेण्यात आली. रविवारी (ता. १) सकाळी ७ वाजता मुलुंड पश्चिमेतील व्ही. पी. रोडवरील लायन्स क्लबच्या प्रांगणातून स्पर्धेचा शुभारंभ झाला. आशिहारा कराटे इंटरनॅशनलचे प्रशिक्षक दयाशंकर पाल यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण आयोजन काटेकोरपणे करण्यात आले. आशिहारा कराटे इंटरनॅशनलमधील प्रशिक्षणार्थींसह मुलुंड पूर्व येथील सौ. लक्ष्मीबाई इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विशेष सहभाग घेतला.
स्पर्धेत ७ वर्षांपर्यंतच्या मुला-मुलींसाठी १ किलोमीटर, ८ ते १२ वयोगटासाठी ३ किलोमीटर, तर १३ वर्षे व त्यावरील स्पर्धकांसाठी ५ किलोमीटर अंतराच्या शर्यती पार पडल्या. सर्व गटांतील स्पर्धकांनी जिद्द, शिस्त व क्रीडावृत्तीचे प्रभावी दर्शन घडवले. मुलुंड पूर्व येथील आर. आर. एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष व मुंबई काँग्रेसचे महासचिव डॉ. राजेंद्र सिंह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विजेत्यांना पदके व स्मृतिचिन्हे प्रदान करण्यात आली. यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG टंचाईमुळे शिर्डी साई मंदिराचा मोठा निर्णय! आता एकच लाडू प्रसाद मिळणार; प्रसादालयाच्या मेनूमध्येही मोठा बदल

Video Viral: जसप्रीत बुमराह हा जलदगती गोलंदाजांमधला उस्मान तारिक; फेकाड्या पाकिस्तानी गोलंदाजासोबत जस्सीची बरोबरी

वागळे की दुनिया फेम भारती आचरेकरांचं मराठी मालिकाविश्वात पदार्पण ! ‘मी जिंकून घेईन सारं’ मालिकेचा प्रोमो चर्चेत

काव्या मारनने एवढ्या आनंदाने अबरार अहमदला संघात घेतले; पाकड्यांनी दाखवली लायकी, The Hundred मधून घेऊ शकतो माघार...

Love-Jihad: आता धर्म बदलणं कठीण होणार, लव्ह जिहाद करणाऱ्यांना शिक्षा मिळणार; महाराष्ट्र सरकारकडून विधेयक सादर

SCROLL FOR NEXT