मुंबई

पडघा ग्रामसभेत अपुऱ्या पाणीपुरवठ्यावर चर्चा

CD

पडघा ग्रामसभेत अपुऱ्या पाणीपुरवठ्यावर चर्चा
तीन कोटी ६८ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास मंजुरी
पडघा, ता. ३ (बातमीदार) ः वाढत्या नागरीकरणामुळे चर्चेत असलेल्या भिवंडी तालुक्यातील पडघा ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत पाणीपुरवठ्याबाबत चर्चा करण्यात आली. नळाद्वारे मिळणाऱ्या अपुऱ्या, कमी दाबाने, गढूळ पाण्याबाबत या वेळी नागरिक आक्रमक झाले होते.
पडघा ग्रामपंचायतीची ग्रामसभा मंगळवारी (ता. ३) सरपंच सायली पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषयासंदर्भात घेण्यात आली. या वेळी २०२६-२७ साठी तीन कोटी ६८ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास मंजुरी घेण्यात आली. या वेळी जुपाडा येथे नदीच्या पाण्याची पातळी खालावल्याने दोन दिवस पाणीपुरवठा बंद असल्याने व इतर वेळेससुद्धा नागरिकांना कमी दाबाने, अपुरा, गढूळ, अनियमित पाणी मिळत असल्याने नागरिकांनी ग्रामसभेत आक्रमक भूमिका घेतली. अनधिकृत नळजोडणी, नवीन इमारतींना पाणीपुरवठा बंद, नळाला नियमबाह्य जोडलेल्या मशीनवर कारवाई व पाणी सोडल्यानंतर वेळ वाढवून देण्याची मागणी या वेळी नागरिकांनी केली.
या वेळी उपसरपंच चंदा साळुंके, ग्रामपंचायत सदस्य शैलेश बिडवी, रवींद्र विशे, अभिषेक नागावेकर, मयुरेश गंधे, नयना जाधव, रश्मी तेलवणे, निता दास, उपस्थित होते. ग्रामपंचायत अधिकारी भास्कर घुडे यांनी उत्तरे दिली, तर या वेळी शरद साने, संतोष सपाट, संतोष मुंराजन, किरण तेलवणे, रूपेश तेलवणे, प्रदीप गायकवाड, स्वप्नील साळुंके, शशांक तांबोळी, संजय जाधव या ग्रामस्थांनी चर्चेत सहभाग घेतला.

‘या’ मागण्या
गावात प्लॅस्टिकबंदी, वाहतूक कोंडी, शासकीय गुरचरण जागेत झालेले अतिक्रमण, टॉवर बांधकाम, ग्रामसभेचा फलक वेळेत न लावणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई, प्रलंबित असलेली नवीन पाणीपुरवठा योजना, बुजवलेली सतीची विहीर, अडगळीत पडलेल्या विहिरी स्वच्छ करणे, अंगणवाडीत शौचालय टाकी, पिण्याचे पाणी, पडघ्यातील मुस्लिम कब्रस्तान, शौचालय स्वच्छताबाबत नागरिकांनी प्रश्न उपस्थित करून त्यावर चर्चा करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway Traffic Jam: मुंबई-पुणे ‘द्रुतगती महामार्गा’वर गॅस टँकर उलटला!, मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प

WPL 2026: जेमिमाहची दिल्ली कॅपिटल्स सलग चौथ्यांदा फायनलमध्ये, गुजरातचा केला पराभव; जेतेपदासाठी RCB शी लढणार

Mumbai Airport incident : मुंबई एअरपोर्टवर भीषण विमान दुर्घटना टळली! ; एअर इंडिया अन् इंडिगो विमानांची पंख एकमेकांना धडकली

मोठी बातमी! ‘टीईटी’त साडेचार लाखातील चार लाख भावी शिक्षक नापास; मराठीचा १२ टक्के तर इंग्रजीचा निकाल ५.४४ टक्के, ३६ जणांचा निकाल ठेवला राखून, वाचा...

Pune Traffic : जेधे चौकात जीव धोक्यात! अतिक्रमण, बेशिस्त वाहनचालकांमुळे पादचाऱ्यांची रोजची कसरत

SCROLL FOR NEXT