वसई-विरार महापालिकेच्या महापौरपदी अजीव पाटील यांची निवड झाली, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन!
साहित्य, कलेतील समरस नेतृत्व ः अजीव पाटील
बहुजन विकास आघाडीचे प्रवक्ते, यंग स्टार ट्रस्टतर्फे साहित्यिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम करणारे मितभाषी, सत्ताधाऱ्यांबरोबर विरोधकांना हवाहवासा चेहरा म्हणजे अजीव यशवंत पाटील. त्यांची वसई-विरार पालिकेच्या सातव्या महापौरपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन.
अजीव पाटील यांना १९८५-८६ पासून पत्रकारितेची आवड असलेले... पुढे पत्रकारांचे मित्र झालेले, साहित्य आणि कलेत समरस झालेले असे नेतृत्व आहे. मामा भास्करराव ठाकूर यांच्या तालमीत त्यांना समाजकारणाचे बाळकडू मिळाले. व्यवसायाने सिव्हील इंजिनिअर असलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे अजीव पाटील. भावाबरोबर व्यवसायात हातभार लावत असताना, १९८७ ला मित्रांसोबत व्यवसायातून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. अनेक शालेय मित्रांना सोबत घेऊन सातत्याने व्यवसायात प्रगती केली. त्याच काळात तत्कालीन आमदार पंढरीनाथ चौधरी यांनी काही झोपडपट्टी भागांतील समस्यांबाबत भाई ठाकूर यांच्यासोबत चर्चा केली. त्या वेळी शेजारी उपस्थित असलेल्या प्रदीप तेंडोलकर, जीतूभाई शहा, हेमंत म्हात्रे, पंकज ठाकूर, अजीव पाटील यांना या प्रश्नांकडे लक्ष घालण्यास भाईंनी सांगितले. येथूनच बांधकाम व्यवसायात कार्यरत असलेल्या टिमने विविध विभागांतील समस्या सोडवण्याचा सपाटा लावला, तो आजतागायत अखंड सुरू आहे.
भास्करराव ठाकूर, भाई ठाकूर, दीपक ठाकूर, हितेंद्र ठाकूर, राजीव पाटील आदींच्या मार्गदर्शनाखाली अजीव पाटील यांची सामाजिक, राजकीय वाटचाल हितेंद्र ठाकूर आमदार होण्याच्या आधीपासूनच सुरू होती. पुढे हितेंद्र ठाकूर यांच्या मित्रपरिवारातील अनेकांचा सहभाग व सहकार्य पालघर जिल्हाभर फोफावले. सुरुवातीला काँग्रेस, नंतर वसई विकास मंडळ, पुढे बहुजन विकास आघाडी, अशी राजकीय नावे बदलत गेली; मात्र त्यांचा राजकीय प्रवास अखंड सुरूच राहिला. १९८५-८६ ला स्थापन झालेल्या यंग स्टार्स ट्रस्टमधून कला, क्रीडा व साहित्याचा अंकुर फुलला, तो आज वसई तालुका कला-क्रीडा महोत्सवच्या रूपात वटवृक्षाप्रमाणे सर्वांसमोर उभा आहे. तालुक्यात अनेक सामाजिक, राजकीय स्थित्यंतरे घडली; मात्र सहकाऱ्यांच्या साथीने सर्व वादळे परतवून लावली गेली. लढाईतील प्रत्येक टप्प्यावर अजीव पाटील यांचा खारीचा वाटा नेहमीच राहिला. १९९० ला झालेल्या पहिल्याच नगरपालिका निवडणुकीत दोन प्रभागांतील कार्यकर्त्यांनी अजीव पाटील यांना उमेदवारीसाठी आग्रह केला; मात्र इतरांना संधी देण्याची भूमिका त्यांनी घेतली. १९९६ ला अत्यंत बिकट परिस्थितीत लढवलेल्या निवडणुकीत विजयी झाले. त्यानंतर नगरपालिका ते पालिकास्तरावर बांधकाम सभापती, विविध समित्यांचे सदस्य तसेच दोन वेळा पालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदावर कार्याची ठसठशीत छाप उमटवली. युवा आमदार क्षितिज ठाकूर यांच्या विविध योजनांना आकार देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. महिला व बालकल्याण समितीवर कार्यरत असताना प्रथम महिला महापौर प्रवीणाताई सोबत महिला, मुलांकरिता अनेक योजना राबवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. स्थायी समितीवर असताना त्यांनी मंजूर केलेली विक्रमी विकासकामे आजही जनतेच्या स्मरणात आहे. पालिकेच्या स्थापनेनंतर न्यायालयीन लढा असो वा वृत्तपत्रीय लढा- स्वर्गीय मुकेश सावे, मा. उमेश नाईक, मा. इक्बाल हुद्दा यांच्यासोबत आघाडीवर राहिले. सध्या यंग स्टार्स ट्रस्ट, कोकण मराठी साहित्य परिषद, साहित्य जल्लोष, कला-क्रीडा महोत्सव, जिल्हा नियोजन समिती, वसई विकासिनी संस्था तसेच अनेक सामाजिक संस्थांवर सक्रियपणे कार्यरत आहेत.
यंग स्टार्स ट्रस्टच्या माध्यमातून संपूर्ण तालुक्यात लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत असंख्य उपक्रमांतून यांनी वसईची वेगळी, सकारात्मक ओळख संपूर्ण महाराष्ट्राला करून दिली आहे. त्यांचे महापौरपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन.
(शब्दांकन- संदीप पंडित)
शुभेच्छुक प्रशांत राऊत
श्रीकृष्ण जन्मोत्सव मंडळ, मनवेलपाडा मा. स्थायी समिती सभापती
महिला विकास मंडळ
युवा विकास मंडळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.