मानधन समितीतील लाभार्थ्यांचा सन्मान
पद्मश्री तारपा वादक भिकल्या धिंडा यांचा विशेष गौरव
पालघर, ता.४ (बातमीदार)ः जिल्हा परिषद ग्राम पंचायत विभागाअंतर्गत राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक, कलाकार मानधन योजनेच्या समिती बैठकीनिमित्त मानधन योजनेतील ६५ लाभार्थी कलाकारांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेले तारपा वादक भिकल्या धिंडा यांचा समितीच्या अध्यक्ष जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड यांनी विशेष सत्कार केला.
पालघर जिल्ह्यातील सर्व कलाकारांची दस्तऐवज पडताळणी देखील करण्यात आली. मानधन योजनेचा लाभ पारदर्शक व पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने कागदपत्रांची तपासणी करण्यात आल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी पद्मश्री पुरस्कारप्राप्त भिकल्या धिंडा यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. तसेच समितीतीलच एक कलाकार पद्मश्री पुरस्कार प्राप्त करतो, ही कलाकारांसाठी प्रेरणादायी बाब असल्याचे सांगितले. तसेच शासनामार्फत सुरू करण्यात आलेले दरमहा पाच हजार रुपये मानधन हे वृद्ध साहित्यिक व कलाकारांसाठी अत्यंत उपयुक्त असून त्यांच्या दैनंदिन गरजा भागविण्यास मोठा आधार ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.
-----------------------------
‘सकाळ’चा पुढाकार
या समितीअंतर्गत १०० इष्टांक निश्चित असून ठराविक निकष ठरवण्यात आले आहेत. या निकषांच्या आधारे पात्र कलाकारांची निवड केली जात असल्याची माहिती देण्यात आली. मानधन समितीची बैठक, लाभार्थ्यांची दस्तऐवज पडताळणी तसेच पद्मश्री पुरस्कारप्राप्त कलाकाराचा गौरव अशा त्रिसूत्री कार्यक्रमामुळे बैठकीला महत्त्व आहे. विशेष म्हणजे, ‘सकाळ’ने बातमी प्रसिद्ध केल्यानंतर समितीची ही पहिलीच बैठक होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.