मुंबई

मनमानी रिक्षाचालकांना चाप

CD

पनवेल, ता. ४ (बातमीदार) : खारघर रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांकडून होत असलेल्या सततच्या तक्रारींची गंभीर दखल घेत पनवेल उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने जोरदार कारवाई केली. मीटरने प्रवास न करणे, मनमानी भाडे आकारणे, तसेच नो-पार्किंग झोनमध्ये ऑटोरिक्षा उभ्या करून कोंडी निर्माण करणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात ही मोहीम राबवण्यात आली. पनवेलचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक स्वरूपात २१ ऑटोरिक्षांवर कारवाई करण्यात आली आहे.

मोटार वाहन निरीक्षक संदीप कोतकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने खारघर रेल्वे स्थानक परिसरात तपासणी नाके उभारून ऑटोरिक्षांची कागदपत्रे, मीटरची स्थिती आणि वाहतूक नियमांचे पालन होत आहे की नाही, याची काटेकोर तपासणी केली. रेल्वे स्थानक परिसरात रिक्षाचालकांकडून प्रवाशांकडून मनमानी भाडे आकारले जात असल्याने तसेच मीटर न लावता प्रवास करून नागरिकांची लूट होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. याशिवाय नो-पार्किंग झोनमध्ये रिक्षा उभ्या केल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होऊन पादचाऱ्यांसह वाहनचालकांनाही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. या पार्श्वभूमीवर पनवेल आरटीओने कठोर भूमिका घेतली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. पुढील काळातही अशीच अचानक तपासणी मोहीम सुरू राहणार असून, नियम मोडणाऱ्यांना कोणतीही सूट दिली जाणार नाही, असा इशारा मोटार वाहन निरीक्षक संदीप कोतकर यांनी दिला आहे.

आरटीओच्या या कारवाईमुळे मनमानी करणाऱ्या रिक्षा चालकांचे धाबे दणाणले असून, प्रवासी व नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे. नियमांचे पालन करूनच प्रवासी वाहतूक करावी, असे आवाहनही परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आज मतदान! मोबाईल घेऊन जाऊ नका, फोटो-व्हिडिओ काढल्यास दाखल होईल गुन्हा; एकच बॅलेटवर दोन्ही उमेदवार, मतदान कसे करायचे? ‘हे’ ओळखपत्र असेल तरी करता येईल मतदान

उजनी धरणात 113 TMC पाणी! भीमा नदीत 15 फेब्रुवारीपर्यंत पाणी तर शेतीचे आवर्तन 28 फेब्रुवारीपर्यंत असणार; पुढे ‘या’ महिन्यात सुटणार दोनदा पाणी, वाचा...

Thalapathy Vijay News : मद्रास उच्च न्यायालयाकडून थलापती विजयला आणखी एक धक्का; दीड कोटींचा दंड भरावा लागणार

U19 World Cup: पुणेकराचं मार्गदर्शन अन् टीम इंडियाने जिंकला वर्ल्ड कप! भारतीय क्रिकेटचे भविष्य घडवणारा मराठमोळा प्रशिक्षक

Zilla Parishad Election: मतदानाच्या एक दिवस आधी गैरहजर! ३५ कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे अन् निलंबन

SCROLL FOR NEXT