मुंबई

काश्मीरच्या सेंद्रिय सफरचंदाचा बाजारात बोलबाला

CD

जुईनगर, ता. ४ (बातमीदार) : काश्मीर खोऱ्यातील श्रीनगर परिसरात सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेली उच्च दर्जाची सफरचंदे आता बाजारात दाखल झाली आहेत. यामुळे ग्राहकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे या सेंद्रिय सफरचंदांचा हंगाम जानेवारी ते जुलैपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती फळ बाजारातील व्यापाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे पुढील सहा महिने सफरचंद खवय्यांसाठी पर्वणी असणार आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळ बाजारात एका गाडीमध्ये एक हजार खोके काश्मिरी सफरचंद येत असून १० ते १५ किलो माल एका खोक्यात असतो. या खोक्यांमध्ये वर्गवारीनुसार ५० ते १२० नग असतात. सध्या या सफरचंदाच्या आकार आणि दर्जानुसार घाऊक बाजारात १५० ते १९० रुपये प्रतिकिलो दराने, तर किरकोळ बाजारात २५० ते ३०० रुपये विक्री होत आहे. तर या सफरचंदाची आवक शेवटपर्यंत एका गाडीपेक्षा अधिक होत नसल्याने हंगाम संपेपर्यंत दर शक्यतो कमी होत नसल्याचे व्यापारी सांगत आहेत.

चवीमुळे ग्राहकांची पसंती
रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा वापर टाळून नैसर्गिक खत, जैविक कीटकनियंत्रण आणि पर्यावरणपूरक पद्धतींचा अवलंब करत ही सफरचंदे पिकवण्यात येतात. त्यामुळे चव, रंग, टिकाऊपणा आणि पोषणमूल्य यामध्ये असल्याने या सफरचंदांना विशेष मागणी असते. ऑक्टोबर घेतलेले पीक आणि त्याला काश्मीर ते मुंबई लागणार सहा दिवसांचा प्रवास तरी या फळाचा गोडवा कायम राहतो.

शहरात मोठी मागणी
सेंद्रिय सफरचंद उत्पादनामुळे शेतकऱ्यांना चांगला दर मिळत असून, आरोग्याबाबत जागरूक असलेले ग्राहकही या सफरचंदांना प्राधान्य देत आहेत. मुंबई आणि उपनगरांमधील प्रतिष्ठित भागांमध्ये याची अधिक विक्री केली जाते.

आपल्या देशाच्या मातीतील आरोग्यदायी फळ ग्राहकांना मिळत असल्याने त्याला चांगली मागणी आहे. शिवाय आपल्या देशात चांगले सफरचंद असताना आजही इराण व तुर्की यासारख्या देशातून आयात करण्यात आलेले सफरचंद लोक विकत घेतात, मात्र आता ग्राहकांना चांगला पर्याय उपलब्ध आहे.
- नजीर अहमद जहाँगीर, व्यापारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PNG Gas Connection : गॅस सिलिंडरचं टेन्शन मिटलं ! आता २४ तासांत मिळेल PNG कनेक्शन, घरबसल्या 'असा' करा अर्ज

RCB चा माजी खेळाडू झाला पुन्हा बाबा; दोन जुळ्या मुलानंतर घरी आली परी

Hindu Nav Varsh: असा मराठी राजा, ज्याचा विजय साजरा करण्यासाठी गुढी उभारण्याच्या प्रथेला झाली सुरुवात; जाणून घ्या इतिहास

Latest Marathi News Live Update : डोणगावमध्ये खंडोबा मंदिरावर वीज कोसळली

Gold Rate Today: गुढीपाडव्याच्या शुभमूहर्तावर सोन्याच्या भावात मोठी घसरण! सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा; पाहा आजचा ताजा भाव

SCROLL FOR NEXT