मुंबई

‘मल्हार’ सांस्कृतिक कार्यक्रमात

CD

‘मल्हार’ सांस्कृतिक कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
विशाल परुळेकर व उषा म्हात्रे यांना ‘एन.एम.ए. मानवता पुरस्कार’ प्रदान

विरार, ता. ५ (बातमीदार) : नालासोपारा मेडिकल असोसिएशन (एन.एम.ए.) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘मल्हार’ या सांस्कृतिक कार्यक्रमात समाजसेवेतील उल्लेखनीय कार्यासाठी साई आधारचे संस्थापक विशाल परुळेकर तसेच थॅलेसेमिया रुग्णांसाठी सातत्याने कार्य करणाऱ्या उषा म्हात्रे यांना ‘एन.एम.ए. मानवता पुरस्कार २०२६’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमात नालासोपारा परिसरातील डॉक्टरांनी स्वतः सहभाग घेत नृत्य, संगीत, नाटक अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले. डॉक्टरांनी आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढत सादर केलेल्या या कलात्मक आविष्कारांमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. समाजातील गरजू व दुर्लक्षित घटकांसाठी निस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करून मानवतेचा संदेश देणे, हा या कार्यक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी नमूद केले आहे. कार्यक्रमास नालासोपारा मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्य डॉक्टर, मान्यवर पाहुणे तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजसेवा आणि सांस्कृतिक एकोप्याचा सुंदर संगम ठरलेला हा कार्यक्रम उपस्थितांच्या मनावर विशेष ठसा उमटवून गेला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष डॉ. सचिन पाटील, सचिव डॉ. सूरज गायकवाड, कोषाध्यक्ष डॉ. सचिन भीरूड, डॉ. प्रशांत होटकर, डॉ. संदिप चौधरी, डॉ. तन्मय दांडेकर, डॉ. सूरज बघेल, डॉ. अतूल पारसकर, डॉ. मनोज खडसे, डॉ. मनमंथ जोशी, डाॅ. हेमंत सरवारे, डॅा. रेणुका पाटील, डॉ. विद्या सावंत, डॉ. प्रेरणा मांजलकर, डॉ. माधवी गोयल, डॉ. आशा मुंढे, डॉ. ज्योती मिश्रा, डॉ. अनेरी गोगरी यांनी विशेष मेहनत घेतली. त्यांच्या नियोजनबद्ध कार्यामुळे आणि संघभावनेमुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आज मतदान! मोबाईल घेऊन जाऊ नका, फोटो-व्हिडिओ काढल्यास दाखल होईल गुन्हा; एकच बॅलेटवर दोन्ही उमेदवार, मतदान कसे करायचे? ‘हे’ ओळखपत्र असेल तरी करता येईल मतदान

उजनी धरणात 113 TMC पाणी! भीमा नदीत 15 फेब्रुवारीपर्यंत पाणी तर शेतीचे आवर्तन 28 फेब्रुवारीपर्यंत असणार; पुढे ‘या’ महिन्यात सुटणार दोनदा पाणी, वाचा...

Thalapathy Vijay News : मद्रास उच्च न्यायालयाकडून थलापती विजयला आणखी एक धक्का; दीड कोटींचा दंड भरावा लागणार

U19 World Cup: पुणेकराचं मार्गदर्शन अन् टीम इंडियाने जिंकला वर्ल्ड कप! भारतीय क्रिकेटचे भविष्य घडवणारा मराठमोळा प्रशिक्षक

Zilla Parishad Election: मतदानाच्या एक दिवस आधी गैरहजर! ३५ कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे अन् निलंबन

SCROLL FOR NEXT