दहावीत घट, बारावीत वाढ
मंगळवारपासून लेखी परीक्षांना सुरुवात
सकाळ वृत्तसेवा
मुंबई ता. ५ ः राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या लेखी परीक्षेस मंगळवारी (ता. १०) सुरुवात होत असून, त्यासाठी विभागीय मंडळाकडून तयारी पूर्ण केली आहे. मुंबई विभागातील पालघर, रायगड, मुंबई दक्षिण, मुंबई पश्चिम, मुंबई उत्तर, आणि ठाणे जिल्ह्यातील दहावीच्या चार हजार ५०१ शाळांतील आणि बारावीच्या एक हजार ७४७ कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थी परीक्षेला सामोरे जात आहेत. यंदा बारावीला तीन लाख ५० हजार १५, तर दहावीला तीन लाख ४८ हजार ४११ विद्यार्थी बसणार आहेत. मागील वर्षांच्या तुलनेत दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या नऊ हजार ०११ ने घटली, तर बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या १० हजार ०२४ ने वाढली आहे. मुंबई विभागात २१ भरारी आणि आठ बैठ्या पथकांची नेमणूक केल्याची माहिती विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेंद अहिरे यांनी दिली.
बारावीच्या परीक्षेत यंदाही एकाही ट्रान्सजेंडरची नोंदणी होऊ शकली नाही, मात्र दहावीचे चार जण परीक्षेला सामोरे जाणार आहेत. दहावीला दोन हजार ६६३ तर बारावीला दोन हजार १७२ दिव्यांग परीक्षा देतील. बारावीत दोन हजार ९२१ विद्यार्थी विशिष्ट विषयांसाठी अधिक गुण मिळावेत म्हणून पुन्हा परीक्षेला सामोरे जात आहेत. दहावीत मात्र एकाच विद्यार्थ्याने हा पर्याय निवडला आहे. दरम्यान, दहावीच्या लेखी परीक्षेला २० फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे.
--
सीसीटीव्हीविना परीक्षा केंद्रे
मुंबई विभागात दहावीची परीक्षा १,००४ तर बारावीची परीक्षा ६७० केंद्रांवर होईल. दहावीची १२७, तर बारावीची ५८ परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सुविधा नाही. ज्या परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही नाहीत, यामध्ये मुंबईतील अनेक श्रीमंत शाळांचाही समोवश असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
--
खासगी विद्यार्थ्यांची विक्रमी संख्या
दहावी-बारावीत खासगीरीत्या बाहेरून परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यंदा मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यात बारावीत १३ हजार ८८१ तर दहावीतील १६ हजार ३९ विद्यार्थी आहेत. फेरपरीक्षा देणाऱ्यांमध्ये बारावीत १० हजार ८१ आणि दहावीत सहा हजार ६१६ जणांचा समोवश आहे.
--
दहावी-बारावीची परीक्षा केंद्रे, विद्यार्थी
जिल्हा दहावी बारावी
विद्यार्थीसंख्या परीक्षा केंद्र विद्यार्थीसंख्या परीक्षा केंद्र
ठाणे १,१९,१०७ ३२६ १,०८,०५४ १९३
पालघर ६४,१७३ १२६ ५६,७५६ ६९
रायगड ३७,६५३ ७५ ३३,१२१ ५२
द. मुंबई २७,९६५ ११२ ३९,४२९ १०४
प. मुंबई ५४,४९३ १९८ ७०,८९० १५०
उ. मुंबई ४५,२९० १६७ ४१,७६५ १०२
एकूण ३,४८,८९९ १००४ ३,५२,९५१ ६७०
-----
परीक्षेची सांख्यिकीय माहिती
तपशील दहावी बारावी
माध्यमिक/उच्च माध्यमिक ४५०१ १७४७
परीक्षा केंद्रे १००४ ६७०
केंद्रसंचालक १०५४ ६७०
भरारी पथके २१ २१
बैठी पथके ८ ८
परीक्षक १२३०० ७७८०
संवेदनशील केंद्र१ ६
सीसीटीव्ही नाही १२७ ५८
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.