मुंबई

वाडवळ लीगमध्ये पंचाळी संघ विजयी

CD

वाडवळ लीगमध्ये पंचाळी संघ विजयी
पालघर, ता. ९ (बातमीदार) : समाजातील तरुणांमध्ये सामाजिक ऐक्य आणि सलोखा जपण्याच्या उद्देशाने आयोजित वाडवळ प्रीमियर लीगमध्ये हितेश आरएमसी पंचाळी संघाने विजेतेपद पटकावले. पालघर जिल्ह्यातील वाडवळ समाज आणि वाडवळ मैत्री संघ यांच्या संयुक्त विद्यमाने उमरोळी येथील मैदानावर दोन दिवस ही स्पर्धा पार पडली. या लीगचे हे सातवे वर्ष असून, दरवर्षी समाजातील तरुणांना एकत्र आणण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले जाते.
या स्पर्धेत पाटील सेना केळवे, मनवा स्पर्श नरपड, आई एकविरा अल्याळी, राजा छत्रपती उमरोळी, हितेश आरएमसी पंचाळी आणि शिव दैवत सालवड या संघांनी सहभाग घेतला होता. अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून हितेश आरएमसी पंचाळी संघाने गोलंदाजी स्वीकारली. शिव दैवत संघाने पाच षटकांत ३२ धावांचे आव्हान उभे केले. मात्र, पंचाळी संघाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट फलंदाजी करत एकही गडी न गमावता लक्ष्य पार केले आणि दहा गडी राखून विजय मिळवला. पाटील सेना केळवे संघाने तिसरे स्थान पटकावले.
बक्षीस वितरण सोहळा ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गिरीश राऊत, समाजाचे पदाधिकारी गिरीश व रेखा राऊत, उत्पल पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. आयोजनासाठी वाडवळ मैत्री संघाचे अध्यक्ष दिपेश पाटील, उपाध्यक्ष कौस्तुभ राऊत, कोषाध्यक्ष पुष्कर पाटील, कांचन राऊत तसेच हितेश पाटील, कल्पक पाटील व अक्षय पाटील यांचे विशेष योगदान लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: बायकोचा छळ टोकाला! नवऱ्याने चौथ्या मजल्यावरुन मारली उडी; पुण्यात धक्कादायक घटना

Investment Fraud Case : फसवणुकीचा धक्कादायक प्रकार : ५२ गुंतवणूकदारांना १.५९ कोटींचा फटका!

Pachod News : पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या युवकाचा दुसऱ्या दिवशी सापडला मृतदेह

Rohit Sharma: मुंबईत राहायचं म्हणजे मराठी बोलता आलंच पाहिजे... हिटमॅनच्या मराठी नाटकाच्या कलाकारांशी गप्पा

Latest Marathi News Live Update : आरटीई प्रवेश निकषांत बदल, विद्यार्थ्यांना फटका बसण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT