खारघरमध्ये रंगणार हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादूर ३५०वा शहिदी समागम
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची प्रमुख उपस्थिती
नवी मुंबई, ता. १० (वार्ताहर) : हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादूर जी यांच्या ३५०व्या शहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्त येत्या २८ फेब्रुवारी आणि १ मार्च २०२६ला खारघरमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
अल्पसंख्याक विकास विभाग, राज्य समन्वय समिती आणि शीख, सिकलगार, बंजारा, लबाना, मोहयाल, सिंधी, वाल्मिकी, उदासीन तसेच भगत नामदेव (वारकरी) संप्रदाय अशा नऊ विविध समाजांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रसह देशभरातून लाखो भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
याप्रसंगी कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी माहिती दिली, की नागपूर आणि नांदेड येथील यशस्वी आयोजनानंतर आता खारघरमधील कार्यक्रमासाठी प्रशासनाने महिनाभरापूर्वीच तयारी सुरू केली आहे. रायगड आणि ठाणे जिल्हा प्रशासनाने विविध जबाबदाऱ्यांसाठी २५ विशेष समित्या नेमल्या आहेत. पोलिस, महापालिका आणि सिडको प्रशासन समन्वयाने काम करीत असून, भाविकांसाठी सर्व आवश्यक सुविधा पुरवल्या जाणार आहेत.
या वेळी राज्यस्तरीय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक यांनी विविध समाजांचा गुरू तेग बहादूरजींशी असलेला ऐतिहासिक वारसा सांगितला आणि सर्वांना सेवाभावाने सहभागी होण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाच्या नियोजन बैठकीला सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे, ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि विविध समाजांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.