मुंबई

तळा केंद्रावर १२ वी बोर्ड परीक्षा कॉपीमुक्त,

CD

तळा केंद्रावर बारावी परीक्षा शांततेत सुरू
तळा, ता. १० (प्रतिनिधी) ः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला मंगळवार (ता. १०)पासून सुरुवात झाली आहे. तळा विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय बारावी परीक्षेची कॉपीमुक्त, भयमुक्त व शांत वातावरणात पार पडत आहे. परीक्षेच्या काळात गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथकांसह अन्य काटेकोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी यंदा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तळा केंद्रावर कला शाखा ७०, वाणिज्य शाखा ७३ तर विज्ञान शाखा ९४ असे एकूण २३७ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत.
तळा केंद्रावर केंद्राध्यक्ष म्हणून प्राध्यापक आय. बी. बोळेगावे, केंद्र उपसंचालक प्राध्यापक पी. एम. गायकवाड, स्टेशनरी सुपरवायझर किरण नागावकर, लिपिक स्वप्नील वरंडे तर शिपाई म्हणून प्रसाद सुतार काम पाहत आहेत. झूम ॲपद्वारे रायगड जिल्हाधिकारी यांना तळा केंद्रावरील परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त, शांतता, पोलिस बंदोबस्त व बैठे पथकांच्या उपस्थितीत पार पडत असल्याचे चित्रीकरण दाखवण्यात येत आहे.
राज्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे म्हणाले की, एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये यासाठी ३ फेब्रुवारीपर्यंत अर्ज स्वीकारण्यात आले. विद्यार्थ्यांनी राज्य मंडळामार्फत प्रसिद्ध आणि छपाई केलेलेच वेळापत्रक ग्राह्य धरावे. गेल्या वर्षीप्रमाणेच परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे वेळ वाढवून देण्यात आली आहे. शिक्षण विभागाच्या ९ जानेवारीच्या शासननिर्णयानुसार परीक्षा केंद्रापासून ५०० मीटर परिसरातील छायांकित प्रतीची दुकाने (झेरॉक्स केंद्र) बंद ठेवणे, संबंधित परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करणे आदी सूचना देण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : "...तर सेवेचा राजीनामा द्या अन् संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा"; राज ठाकरेंची IPS विश्वास नांगरे पाटलांवर टीका

Malvan Swimming Pool VIDEO : काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ! स्विमिंग पूलमध्ये उंचावरून मारली उडी, डोकं तळाशी जोरात आपटलं, 25 वर्षीय युवकाचा दुर्दैवी अंत

Latest Marathi News Live Update : विशाळगडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात; मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती

Mumbai Water Supply: मुंबईवर कपातीचे संकट! धरणांनी गाठला तळ, अत्यल्प पावसामुळे चिंता

Video Viral: जग पाहता येत नाही... पण बापाच्या शब्दांनी रोनाल्डोचा गोल अनुभवला; लेकाची रिअ‍ॅक्शन डोळे पाणावतील

SCROLL FOR NEXT