डोंबिवलीचा सुपुत्र रचणार जागतिक विक्रम
सलग ६४ दिवस ''मॅरेथॉन'' यशस्वी पूर्ण; ३७० दिवस दररोज धावण्याचा विशाखचा निर्धार!
डोंबिवली, ता. १० : जिद्द, चिकाटी आणि असीम ध्येयवेडेपणाच्या जोरावर डोंबिवलीचा धावपटू विशाख कृष्ण स्वामी एका ऐतिहासिक जागतिक विक्रमाला गवसणी घालण्यासाठी सज्ज झाला आहे. सलग ३७० दिवस दररोज ४२ किलोमीटर (फुल मॅरेथॉन) अंतर धावण्याचा अत्यंत कठीण संकल्प त्याने केला असून, सध्या संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष त्याच्या या मोहिमेकडे लागले आहे. विशाख हा एका सामान्य कुटुंबातील तरुण असून, धावपटू म्हणून त्याने यापूर्वीच राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर अनेक पदके आपल्या नावावर केली आहेत. दररोज ४२ किलोमीटर धावणे हे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अत्यंत थकवणारे असते, मात्र विशाखने हे आव्हान केवळ स्वीकारले नाही, तर त्याचे ६४ दिवस अत्यंत उत्साहात पूर्णही केले आहेत.
विशाख दररोज ज्या मार्गावरून धावतो, तिथे त्याला प्रोत्साहन देण्यासाठी पहाटेपासूनच नागरिकांची गर्दी पाहायला मिळते. "महाराष्ट्राचे आणि माझ्या डोंबिवलीचे नाव जागतिक स्तरावर नेण्याची माझी जिद्द आहे," अशा शब्दांत विशाखने आपला निर्धार व्यक्त केला. त्याच्या या धाडसाचे कौतुक केवळ शहरातच नव्हे, तर सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरातून होत आहे.
विक्रमाचे गणित
लक्ष्य: सलग ३७० दिवस.
दैनिक अंतर: ४२ किलोमीटर (फुल मॅरेथॉन).
पूर्ण झालेले दिवस: ६४ दिवस.
उद्दिष्ट: जागतिक विक्रमाची नोंद करणे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.