मुंबई

‘एम.एचएमसीटी’ सीईटीच्या प्रवेश नोंदणीस मुदतवाढ

CD

‘एमएचएमसीटी’ सीईटीच्या प्रवेश नोंदणीस मुदतवाढ
मुंबई, ता. १० : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे २०२६मध्ये घेतल्या जाणाऱ्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी मास्टर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी (एमएचएमसीटी) या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सीईटीची प्रवेश नोंदणीसोबतच मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन (एमसीए) या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सीईटीची प्रवेश नोंदणीला १८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ‘एमसीए’ या अभ्यासक्रमास ३१,९६१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर एमएचएमसीटी या अभ्यासक्रमास ४० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. एमसीए या अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा ३० मार्च २०२६ला होणार आहे. तर एमएचएमसीटी या अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा २५ मार्च २०२६ला होणार आहे. मागील वर्षी एमसीए सीईटी प्रवेश परीक्षेमध्ये ५६,२५७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तर एमएचएमसीटी सीईटी प्रवेश परीक्षेमध्ये ८० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज, नोंदणी वेळापत्रक आणि माहिती पुस्तिका राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या www.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अभ्यासक्रमांसाठीची सीईटी परीक्षा महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर संगणकाधारित पद्धतीने ऑनलाइन घेतल्या जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: कच्चे तेल 72 डॉलरवर घसरले! देशात पेट्रोल-डिझेल-CNG चे नवे दर जाहीर; तुमच्या शहरात किती आहे भाव?

Ketan Agarwal Murder : साखरपुडा, प्रेमसंबंध अन् टक्कल वादातून उलगडले रहस्य! सिया गोयलच्या भावाला चेतनच्या नात्याबद्दल माहिती होती

Shaktipeeth Highway : "सागरेश्वर अभयारण्यातून 'शक्तिपीठ' नेण्याचा निर्णय तातडीनं बदला, अन्यथा फडणवीसांच्या 'वर्षा' निवासस्थानासमोर आत्मदहन करणार"

'नवऱ्यापेक्षा जास्त मी तुझ्यावर प्रेम करते' चाहतीनं भर कार्यक्रमात शाहरुखला केलं प्रपोज, किंग खान म्हणाला...'एकट्यात सांगायचं ना...'

Latest Marathi News Live Update : राज्यातील 24 जिल्ह्यांसाठी आज 'यलो अलर्ट'; अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT