मुंबई

ठाणे वडपे रस्त्याचा १४ वर्षाचा वनवास संपेना

CD

ठाणे-वडपे रस्त्याला प्रदीर्घ विलंब
जिल्हाधिकाऱ्यांना उपमुख्यमंत्री शिंदे यांचे जबाबदारांवर कारवाईचे निर्देश

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. १२ : ठाणे ते वडपे रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हे गेल्या १४ वर्षांपासून सुरू आहे. अद्यापही हे काम पूर्ण न झाल्याने त्या परिसरातील नागरिकांना वाहतूक कोंडीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत बुधवारी (ता. १०) झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या रस्त्याच्या कामाबाबत व त्याच्या दर्जाबाबत लोकप्रतिनिधींनी आवाज उठवल्यानंतर, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांना प्रत्यक्ष पाहणी करून कामात दोषी आढळणाऱ्या ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, असे निर्देश दिले आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून भिवंडी-वडपे रस्त्यावरील खड्डे आणि त्यातून होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक व स्थानिक नागरिक हैराण झाले आहे. या रस्त्यावर अनेक अपघात होऊन असंख्य नागरिकांचा मृत्यूही झाला आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार शांताराम मोरे यांनी भिवंडी-वडपे रस्त्याबाबत नाराजी व्यक्त केली. ठाणे ते वडपे जाण्यासाठी दोन तास लागल्याची गंभीर बाब बैठकीत निदर्शनास आणून देत, वाहतूक कोंडीमुळे होणारा त्रास याचा पाढा वाचला. रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी संबंधित एमएसआरडीसीचे अधिकारी यांनी जाब विचारला असता, आतापर्यंत दोन ठेकेदारांवर कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कामाच्या दर्जा व गुणवत्तेबाबत व्हीजेटीआय या कंपनीकडून रस्त्याच्या कामाची तपासणी केली असून त्यामध्ये २१ हजार ४०० पॅनेलपैकी दोन हजार ८०० पॅनेल रिप्लेस करण्याचा अहवालात नमूद करण्यात आले आहे. यावरून उपमुख्यमंत्र्यांनी संताप व्यक्त करीत अधिकारी काय करतात? तसेच आता हे काम कोण अधिकारी बघत आहे, याबाबत विचारणा केली. तसेच जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांना प्रत्यक्ष रस्त्याची पाहणी करून संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले.

...........................................

चौकट

* यापूर्वी केले अधिकाऱ्याचे निलंबन
ठाणे ते भिवंडी-वडपे येथील रस्ता अजून का झाला नाही? तो काय मुंबई-गोवा महामार्गासारखा ऐतिहासिक रस्ता आहे का? काम होत नसेल तर अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर कारवाई करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. तसेच काम करत नसाल तर तुम्हालादेखील निलंबित करीन, असा इशारा देत, तत्काळ डोंगरे नावाच्या अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT