मुंबई

उष्णतेवर गावठी कलिंगडाचा उतारा

CD

कडक उन्हाळ्यात कलिंगडाचा गोडवा
भिवंडी-वाडा महामार्गावर लाल रसाळ फळांची मांदियाळी
वज्रेश्वरी, ता. १२ (बातमीदार) : सध्या थंडी कमी झाली असून उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या उष्णतेमुळे अंगाची लाहीलाही होत असतानाच, शरीराला थंडावा देणाऱ्या कलिंगडांनी बाजारपेठ सजली आहे. विशेषतः भिवंडी-वाडा महामार्गावरील विविध नाक्यांवर कलिंगड विक्रीची दुकाने थाटण्यात आली असून, ग्राहकांचाही त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
भिवंडी वाडा महामार्गावरील धोंडावडवली, महापोली, अंबाडी, दुगाड फाटा व बाजारपेठेत वज्रेश्वरी, आनगाव आणि शहरातील अनेक भागात कलिंगड विक्री करतांना विक्रेते दिसतात. अशा महामार्गावरील गावांच्या नाक्यावर तात्पुरती दुकाने सजलेली बघायला मिळत आहेत. यावर्षी स्थानिक शेतकऱ्यांकडून माल थेट उपलब्ध होत असल्याने स्वस्त दरात कलिंगड मिळत आहेत. यामुळे ग्राहक व व्यापारी वर्ग आनंदात आहेत.
दरम्यान,तसेच, व्यापारी थेट बांधावर येऊन माल उचलत असल्याने शेतकऱ्यांचा वाहतुकीचा खर्च वाचत आहे. नजीकच्या वाडा तालुक्यात कलिंगडाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. पावसामुळे यावर्षी लागवडीला विलंब झाला असला तरी अनेकांनी नियोजन करून चांगले उत्पन्न घेतल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले. कलिंगड तालुक्यातच मिळत असल्याने ग्राहकांना देखील याचा लाभ होत आहे.

विविध जाती आणि दर
बाजारपेठेत सध्या कलिंगडाच्या विविध जाती दाखल झाल्या आहेत. शुगर किंग, गोल्डन, अगस्ता अशा विविध जातीच्या कलिंगडाना विशेष मागणी असून ४० ते १०० रुपये नगाने विक्री केली जात आहे. तसेच किरकोळ दरानेही विक्री होत असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला ते परवडत आहे.

महिलांसाठी रोजगाराची संधी
कलिंगड विक्री हा ग्रामीण भागातील महिलांसाठी एक चांगला लघुउद्योग म्हणून समोर आला आहे. सध्या उष्णता वाढल्याने कलिंगडाला मागणी जास्त आहे. यामुळे दिवसाकाठी चांगला व्यवसाय होत असल्याचे महिला विक्रेत्या सुमन गहला यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात बेसिक पे 69000 रुपये, वार्षिक वाढ 6 टक्के; 51 पानांचं निवेदन

Radhanagari Bee Attack: रक्षाविसर्जनाला कावळ्याची वाट पाहणं पडलं महागात! कावळ्यासोबत मधमाशा आल्या अन्; १०० जखमी तर १२ गंभीर, लोकांना पळता भुई थोडी, व्हिडिओ व्हायरल

Ruturaj Gaikwad: 'काळजी नको, लवकरच मी...', ऋतुराज खराब फॉर्मवर स्पष्ट बोलला; CSK च्या खराब फिल्डिंगबद्दल काय म्हणाला?

Latest Marathi News Live Update: नेस्को सेंटर मध्ये ड्रग्स पार्टी प्रकरणात लायझनिंग करणारा इंद्रजीत सिंग याला तात्काळ अटक करा; मनसेची मागणी

चौधरी बिहारचे नवे 'सम्राट', मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ; दोन उपमुख्यमंत्र्यांचाही शपथविधी, नितीशकुमार उपस्थित

SCROLL FOR NEXT