मुंबई

सफाळे परिसराच्या विकासाला गती

CD

सफाळे परिसराच्या विकासाला गती
अंतर्गत रस्ते प्रकल्पांचे उद्घाटन, दळणवळण सक्षम होणार
पालघर, ता. १२ (बातमीदार) ः सफाळे परिसरासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या अंतर्गत रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार विलास तरे यांच्या हस्ते माजी राज्यमंत्री मनीषा निमकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. या प्रकल्पामुळे दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे.
झाई- बोर्डी- तारापूर- परनाळी- सफाळे- पारगाव- वरई राज्य मार्ग क्रमांक आठच्या सुधारणेचा व्यापक प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. सफाळे- टेंभी- खोडावे मार्गावरील ९०.२० किलोमीटर लांबीचा रस्ता विकसित करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील संपर्क अधिक सुकर होऊन उद्योग, शेती, पर्यटन आणि दैनंदिन प्रवासाला मोठा दिलासा मिळणार आहे. या कामासाठी १६५ कोटींची ठेका देण्यात आला आहे. प्रकल्पांतर्गत २६ किलोमीटरचा नवीन रस्ता बांधकाम, २२ किलोमीटर रस्त्याचे नूतनीकरण आणि पाच किलोमीटर रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे.
------------------------
जलद प्रवासाची सुविधा
या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, अपघातांचे प्रमाण घटेल, ग्रामीण भागातील नागरिकांना सुरक्षित व जलद प्रवासाची सुविधा मिळेल. स्थानिक बाजारपेठा, शैक्षणिक संस्था, आरोग्य सेवा, शासकीय कार्यालयांपर्यंत पोहोचणे अधिक सोपे होणार आहे.
----------------------------
सफाळे परिसरातील नागरिकांना दर्जेदार रस्ते सुविधा मिळाव्यात, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पालघर जिल्ह्याच्या विकासाला निश्चितच गती मिळेल.
- विलास तरे, आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT