मुंबई

उल्हासनगरात उभारणार जिल्ह्यातील पहिले तीन मजली लिफ्टचे सौचालय,

CD

उल्हासनगरमध्ये उभारणार तीन मजली लिफ्टचे शौचालय
नगरसेवक राजेंद्रसिंह भुल्लर-महाराज यांची माहिती
उल्हासनगर, ता. १२ (बातमीदार) ः उल्हासनगरमधील गुलशन नगर परिसरातील रहिवाशांसाठी एक अनोखा प्रकल्प साकारला जात आहे. शिवसेना शहरप्रमुख व नगरसेवक राजेंद्रसिंह भुल्लर-महाराज यांच्या पुढाकाराने या भागात तीन मजली लिफ्टची सुविधा असलेले शौचालय उभारण्यात येणार आहे. जिल्ह्यातील आणि राज्यातील अशा प्रकारचे हे पहिलेच शौचालय असणार आहे, असा दावा भुल्लर-महाराज यांनी केला आहे. यावेळी महापौर अश्विनी निकम, माजी आमदार पप्पू कलानी, शिवसेना गटनेते अरुण आशान, नगरसेवक नाना बागूल, दिलीप गायकवाड, नगरसेविका संघमित्रा हजारे आदी उपस्थित होते.
प्रभाग क्रमांक तीनमध्ये गुलशन नगर असून तिथे एकमेव शौचालय आहे. त्यामुळे याठिकाणी गर्दी होऊन मोठ्या रांगा लागतात. निवडणुकीच्या काळात याठिकाणी प्रशस्त असे तीन मजली लिफ्टची व्यवस्था असणारे अत्याधुनिक शौचालय महानगरपालिकेच्या निधीतून बांधून देण्याचे आश्वासन राजेंद्रसिंह भुल्लर-महाराज यांनी रहिवाशांना दिले होते. या पार्श्वभूमवीर पुरुष, महिला, दिव्यांग, वयोवृद्ध यांच्यासाठी वेगवेगळ्या शौचालयांची व्यवस्था या इमारतीत असणार आहे. लवकरच या शौचालयाचे भूमिपूजन करण्यात येणार असून तात्काळ कामास सुरुवात करण्यात येणार आहे, असे भुल्लर-महाराज यांनी सांगितले. भुल्लर-महाराज यांची तीन मजली लिफ्टच्या शौचालयाची संकल्पना उत्तम असून हे लवकर पूर्ण करण्यासाठी महानगरपालिकेकडे पाठपुरावा करणार, असे महापौर अश्विनी निकम, गटनेते अरुण आशान यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात बेसिक पे 69000 रुपये, वार्षिक वाढ 6 टक्के; 51 पानांचं निवेदन

Radhanagari Bee Attack: रक्षाविसर्जनाला कावळ्याची वाट पाहणं पडलं महागात! कावळ्यासोबत मधमाशा आल्या अन्; १०० जखमी तर १२ गंभीर, लोकांना पळता भुई थोडी, व्हिडिओ व्हायरल

Ruturaj Gaikwad: 'काळजी नको, लवकरच मी...', ऋतुराज खराब फॉर्मवर स्पष्ट बोलला; CSK च्या खराब फिल्डिंगबद्दल काय म्हणाला?

Latest Marathi News Live Update: नेस्को सेंटर मध्ये ड्रग्स पार्टी प्रकरणात लायझनिंग करणारा इंद्रजीत सिंग याला तात्काळ अटक करा; मनसेची मागणी

चौधरी बिहारचे नवे 'सम्राट', मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ; दोन उपमुख्यमंत्र्यांचाही शपथविधी, नितीशकुमार उपस्थित

SCROLL FOR NEXT