मुंबई

राज्यातील नद्यांच्या पूररेषांचे पुनर्सर्वेक्षण

CD

राज्यातील नद्यांच्या पूररेषांचा फेरआढावा घेणार
ना-विकास क्षेत्रातील जमिनींना मिळणार दिलासा
बदलापूर, ता. १२ (बातमीदार) ः राज्यातील नद्यांच्या निळ्या व लाल पूररेषांबाबत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. जलसंपदा विभागाने यापूर्वी निश्चित केलेल्या पूररेषा सदोष असल्याच्या तक्रारींनंतर आता नगरविकास विभागाने या रेषांचे पुनर्सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली असून, यामुळे रखडलेल्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.
ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदी, रायगडमधील सावित्री, पुण्यातील मुळा-मुठा, कोल्हापुरातील पंचगंगा यांसह अनेक नद्यांच्या पूररेषांमुळे शेकडो हेक्टर जमीन ‘ना-विकास’ क्षेत्रात गेली होती. याचा थेट फटका पुनर्विकास, नव्या इमारतींची उभारणी आणि शहरांच्या एकूण विकासाला बसला होता. नव्या सर्वसमावेशक विकास नियंत्रण नियमावलीतील तरतुदींमुळे अडचणी वाढल्याची ओरडही होत होती. आता पुनर्सर्वेक्षणाच्या माध्यमातून पूररेषेतील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी अतिरिक्त हस्तांतरणीय बांधकाम हक्क (टीडीआर) देण्याचा विचार केला जाणार असून, आवश्यक असल्यास विकास नियंत्रण नियमावलीत बदल सुचवण्याचे अधिकारही समितीला देण्यात आले आहेत.

उच्चस्तरीय समिती गठीत
या संदर्भात गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत प्रश्न उपस्थित झाल्यानंतर नगरविकास विभागाने तातडीने कारवाई करत समिती गठीत केली आहे. नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव समितीचे अध्यक्ष असतील. जलसंपदा, पर्यावरण आणि मदत व पुनर्वसन विभागांचे अपर मुख्य सचिव, मेरी संस्थेचे महासंचालक संजीव टाटू, नगररचना संचालक यांच्यासह विविध महानगरपालिका आयुक्त आणि नगरपरिषदेचे मुख्याधिकारी समितीत सहभागी असतील. पूरामुळे होणारी वित्त व जीवितहानी, नदीची वहन क्षमता, प्रवाहाची दिशा, जोते पातळी आणि सभोवतालचा विकास यांचा अभ्यास करून समितीने दोन महिन्यांत सर्वसमावेशक प्रारूप अहवाल शासनाकडे सादर करायचा आहे. या निर्णयामुळे राज्यातील अनेक शहरांच्या विकासाला मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT