मुंबई

गावातील समस्यांवर थेट मंत्र्यांशी चर्चा

CD

गावातील समस्यांवर थेट मंत्र्यांशी चर्चा
मोखाड्यातील मुलांची मंत्रालयाला भेट, परिवर्तन संस्थेचा पुढाकार
भगवान खैरनार ः सकाळ वृत्तसेवा
मोखाडा, ता.१२ ः मोखाड्यासारख्या आदिवासी अतिदुर्गम भागातील शाळकरी मुलांना लोकशाही प्रणालीची माहीती व्हावी म्हणून परिवर्तन महिला संस्थेच्या पुढाकारातून मंत्रालयाला भेट दिली होती. यावेळी गावातील समस्यांबाबत मुलांनी थेट मंत्र्यांसोबतच चर्चा केली.
मोखाड्यातील आसे आणि मोऱ्हाडा ग्रामपंचायत हद्दीतील प्राथमिक शाळेतील १ ते ८ वर्गातील १६ बालपंचायत सदस्य, १० परिवर्तन संस्थेच्या सदस्यांनी महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांची मंत्रालयात भेट घेतली. यावेळी मुलांनी गावातील मुलांच्या, त्यांच्या शाळांच्या विविध प्रश्नांवर प्रकाश टाकला. अगदी शाळेमध्ये शौचालयांची उपलब्धीपासून गावातील बालविवाह थांबवण्यासाठी त्यांनी विस्तृत चर्चा मंत्र्यांबरोबर केली.
------------------------------------------------
शाबासकीची थाप
मुलांचा आत्मविश्वास, स्वतःच्या गावाप्रती असलेले प्रेम, मुलांच्या प्रश्नांबाबत असलेली मंत्री आदिती तटकरे यांनी कौतुक केले. परिवर्तन महिला संस्था करत असलेल्या याकामाचा उल्लेख करत, अशा उपक्रमांची देशभरात गरज असल्याचे सांगितले. तसेच अशा प्रक्रियेमुळे एक सजग, जागृत आणि देशाप्रती प्रेम आणि कर्तव्याची भावना असलेला व्यक्ती निर्माण होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
---------------------------------------------
१०५ मुलांना प्रशिक्षण
- मोखाडा तालुक्यातील मोऱ्हांडा, आसे ग्रामपंचायतीमध्ये बालपंचायत संस्थेने स्थापन केल्या आहेत. मोऱ्हांडा ग्रामपंचायतीमध्ये तुळ्याचापाडा, शेरीचापाडा,मोऱ्हांडा या गावात बालपंचायत आहेत. आसे ग्रामपंचायत मध्ये स्वामीनगर, आसे, ब्राह्मणगाव, कुंभीपाडा गावात बालपंचायत आहेत.
- परिवर्तन महिला संस्थेच्या माध्यमातून बालपंचायतमधील १०५ मुलांना जीवन कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले जाते. ग्रामपंचायत बरोबर संपर्क करून त्यांच्या बालग्रामसभा लावण्यात येतात मूल शाळेच्या, गावाच्या समस्या बोलतात. त्यामुळे बालवयातच गावगाड्यांची जाण होऊ लागली आहे.
.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: पाणी समजून टरपेंटाईन पिलं, दोन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू; नागपूरमधील घटना

Gadchiroli News: उघड्यावर असलेले धान उचलणार कधी?; दुर्लक्षामुळे धान्याची नासाडी; दोन लाख ३८ हजार ५४९ क्विंटल धानाची उचल नाहीच

Latest Marathi News Live Update: नीरव मोदीला भारतात आणलं जाणार, CBIचे अधिकारी लंडनमध्ये

Global Economy: युद्धामुळे इंधन, खतांचे दर दीर्घकाळ चढेच राहणार; IMF आणि जागतिक बँकेचा इशारा!

IPL, CSK vs KKR: अजिंक्य रहाणे दुहेरी कात्रीत सापडला; आधी कोलकाताने मॅच हरली, नंतर BCCI ने कारवाई केली; नेमकं काय झालं?

SCROLL FOR NEXT