मुंबई

दत्तनगर स्मशानभूमी नूतनीकरण मार्गी

CD

डोंबिवलीतील मोक्षधाम स्मशानभूमीचे नूतनीकरण
दोन महिन्यांच्या विलंबानंतर कामाला मुहूर्त; गॅस शवदाहिनी सुरू, लाकडी दहन मात्र बंद राहणार

डोंबिवली, ता. १२ ः डोंबिवली पूर्व भागातील वर्दळीची आणि महत्त्वाची मानली जाणारी दत्तनगर येथील मोक्षधाम स्मशानभूमी नूतनीकरणासाठी येत्या शनिवार (ता. १४)पासून बंद करण्यात येणार आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेने याबाबतचा अधिकृत फलक स्मशानभूमीबाहेर लावून नागरिकांना सूचित केले आहे. या स्मशानभूमीच्या नूतनीकरणाचे काम खरे तर १ डिसेंबरपासूनच सुरू होणार होते; मात्र एकाच वेळी स्मशानभूमी पूर्णपणे बंद ठेवण्यास मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) यांनी जोरदार विरोध दर्शवला होता. गॅस शवदाहिनी सुरू ठेवून लाकडी दहन सुरूच ठेवावे, अशी मागणी करण्यात आली होती. या राजकीय वादात आणि तांत्रिक पेचात दोन महिने उलटल्यानंतर अखेर तोडगा निघाला आहे.
दत्तनगर स्मशानभूमी बंद असल्याने अंत्यविधीसाठी पालिकेने कुंभारखान पाडा स्मशानभूमी, डोंबिवली (पश्चिम), पाथर्ली स्मशानभूमी, कल्याण रोड, डोंबिवली (पूर्व), म्हसोबा चौक स्मशानभूमी, ठाकुर्ली, डोंबिवली (पूर्व) हे तीन पर्याय सुचविले आहेत. दत्तनगर स्मशानभूमीचे बांधकाम जुने झाल्याने नागरिकांना अनेक अडचणी येत होत्या. आता नूतनीकरणानंतर येथे आधुनिक सुविधा, बसण्यासाठी उत्तम जागा आणि सुसज्ज यंत्रणा उभारण्यात येणार आहे. यामुळे डोंबिवलीसह आसपासच्या ग्रामीण भागातील नागरिकांची मोठी सोय होईल, असा विश्वास केडीएमसी प्रशासनाने व्यक्त केला आहे. नूतनीकरणानंतर दत्तनगर मोक्षधाम येथे आधुनिक सुविधांनी सुसज्ज स्मशानभूमी उभारण्यात येणार असून नागरिकांच्या अडचणी मोठ्या प्रमाणात कमी होतील, असा दावा महापालिकेने केला आहे.

कामाचे स्वरूप आणि नियमावली
पाडकाम व पुनर्बांधणी : १४ फेब्रुवारीपासून जुन्या स्ट्रक्चरचे पाडकाम सुरू होईल.
गॅस शवदाहिनी सुरू : कामाच्या काळात फक्त गॅस शवदाहिनी सुरू राहील, जेणेकरून नागरिकांची गैरसोय टळेल.
लाकडी दहन बंद : लाकडी दहन प्रक्रिया पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT