मुंबई

२० हजारांची लाच भोवली

CD

२० हजारांची लाच भोवली
जव्हारमध्ये दोन तलाठ्यांना रंगेहात पकडले
जव्हार, ता.१२(बातमीदार)ः प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर घरकुलाच्या बांधकामासाठी खरेदी केलेला ट्रॅक्टरवरील जप्ती टाळण्यासाठी तसेच विनाअडथळा काम सुरू ठेवण्यासाठी २० हजारांची मागण्यात आली होती. या प्रकरणात दोघा तलाठ्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.
ग्राम महसूल अधिकारी गजानन जोहरे (सजा-जामसर), सीताराम इंगम (सजा-हिरडपाडा), ता. जव्हार, जि. पालघर यांनी प्रत्येकी १० हजार रुपयांची लाच मागितली होती. या तक्रारीची पडताळणी करून सापळा रचण्यात आला. मंगळवारी दुपारी तक्रारदाराकडून २० हजारांची लाच स्वीकारताना दोन्ही अधिकाऱ्यांना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी जव्हार पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ (सुधारित अधिनियम २०१८) कलम ७, ७-अ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालघर पोलिस अधीक्षक दादाराम करांडे, ठाणे पोलिस अधीक्षक शिवराज पाटील, ठाणे अपर पोलिस अधीक्षक भागवत सोनवणे, ठाणे तथा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Andaman Sea tragedy : अंदमान समुद्रात भीषण दुर्घटना; २५० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती, मानव तस्करीचा उलगडा

Abhishek Sharma Axar Patel Dope Test : अभिषेक शर्मा, अक्षर पटेल 'नाडा' च्या रडारवर; आता कुठे जाता हे सांगावं लागेल... नाहीतर...

खट्याळ, बिनधास्त आणि गप्पिष्ट बाईची मजेशीर दुनिया; कॉमेडी क्वीन निर्मिती सावंत यांच्या ‘भागूबाई’चा ट्रेलर प्रदर्शित

Latest Marathi News Live Update: मुंबईत गांजा विकणाऱ्या दोन आरोपींना अटक

सतीश राजवाडे आणि ये रिश्ता फेम अभिनेत्रीचा रंगभूमीवर कमबॅक; नाटकाचं नाव आणि शुभारंभाची तारीख जाहीर

SCROLL FOR NEXT