मुंबई

नवी मुंबई पोलिस दलाला गुणवत्तेचेही कोंदण

CD

नवी मुंबई, ता. १२ (वार्ताहर) : कार्यक्षमता, पारदर्शकता आणि नागरिक सेवांमध्ये सातत्य राखणाऱ्या नवी मुंबई पोलिस दलाने एक मोठी मजल मारली आहे. नवी मुंबई पोलिस आयुक्तालयांतर्गत येणारी सर्व महत्त्वाची कार्यालये आणि पोलिस ठाण्यांना आता जागतिक स्तरावर प्रतिष्ठित असलेले आयएसओ ९००१:२०१५ प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. यामुळे नवी मुंबई पोलिस दल हे राज्यातील एक ‘हायटेक’ आणि दर्जेदार सेवा देणारे दल म्हणून अधिक ठळकपणे समोर आले आहे.

आयएसओ ९००१:२०१५ मानांकन हे उत्तम व्यवस्थापन आणि गुणवत्तापूर्ण कामाची पावती मानली जाते. या यशामुळे नवी मुंबई पोलिसांच्या कामकाजात अधिक शिस्त येणार असून, तक्रारदारांना दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये वेग आणि पारदर्शकता वाढणार आहे. नागरिकांची सुरक्षितता वाढवणे आणि पोलिस प्रशासकीय कामकाजाचा दर्जा आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

आधुनिकतेकडे पाऊल
नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाने आपल्या कामाच्या पद्धतीत बदल करत, कागदपत्रांची हाताळणी, मुद्देमाल व्यवस्थापन आणि पोलिस ठाण्यातील सुटसुटीतपणा यावर विशेष भर दिला आहे. एव्हिडन्स मॅनेजमेंट सेंटरसारख्या विभागांना मिळालेले मानांकन हे तपासातील अचूकता वाढवण्यासाठी उपयुक्त ठरेल. या यशामुळे सर्वसामान्य नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे, असा विश्वास पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी व्यक्त केला आहे.

या कार्यालयांचा आणि विभागांचा समावेश :
प्रमाणपत्र मिळालेल्या विभागांमध्ये पोलिस आयुक्तालय मुख्य कार्यालयापासून ते स्थानिक पोलिस ठाण्यांपर्यंत सर्वांचा समावेश आहे.
मुख्य कार्यालये : पोलिस आयुक्त कार्यालय (गुन्हे शाखा, विशेष शाखा आणि प्रशासकीय विभाग)
पोलिस मुख्यालय, डीसीपी वाहतूक शाखा (सर्व युनिट्स), मोटार परिवहन विभाग आणि पुरावे व्यवस्थापन केंद्र
वाशी विभाग : वाशी, एपीएमसी, रबाळे, कोपरखैरणे, रबाळे एमआयडीसी
तुर्भे विभाग : तुर्भे एमआयडीसी, नेरूळ, एनआरआय, सीबीडी बेलापूर, सानपाडा
पनवेल विभाग : खारघर, तळोजा, कळंबोली, खांदेश्वर, कामोठे, पनवेल शहर, पनवेल तालुका
पोर्ट विभाग : उरण, न्हावा शेवा, मोरा सागरी, उलवे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT