मुंबई

मुलांवर अपेक्षांचे ओझे लादू नका : डॉ. ओंकार माटे

CD

मुलांवर अपेक्षांचे ओझे लादू नका : डॉ. ओंकार माटे
एसएससी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी व पालकांसाठी मार्गदर्शन
नेरूळ, दि. १२ (बातमीदार) : पुणे विद्यार्थी गृहाच्या नेरूळ येथील विद्याभवन शिक्षण संकुलात एसएससी परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांसाठी परीक्षेचे दडपण कसे टाळावे या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मानसोपचार तज्ञ डॉ. ओंकार माटे यांनी पालकांनी मुलांवर आपल्या अपेक्षांचे ओझे लादू नये, असे आवाहन केले.
डॉ. माटे यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करण्याचा सल्ला देताना प्रत्येकाचे नियोजन वेगवेगळे असते, हे लक्षात ठेवण्याची गरज असल्याचे सांगितले. अभ्यासात ब्रेकचे योग्य नियोजन, मोबाइलसारख्या लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी दूर ठेवणे, कमकुवत भाग एकाच वेळी न अभ्यासणे, तसेच नेमोनिक मेमरी व झटपट सराव तंत्राचा वापर करण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. पालकांनी विद्यार्थ्यांना जंक फूड देणे टाळावे, अभ्यासादरम्यान अनावश्यक सूचना देऊ नयेत, तुलना करू नये आणि सकारात्मक वातावरण ठेवावे, असा सल्ला देण्यात आला.
या कार्यक्रमास पुणे विद्यार्थी गृहाचे कुलसचिव दिनेश मिसाळ, मुख्याध्यापक गोरख कदम, समन्वयक पांडुरंग मुळीक, आदर्श शिक्षक अविनाश कुलकर्णी तसेच विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Heatwave: पुणे परिसरात उष्णतेचा तडाखा; लोहगावचा पारा ४२ अंशांवर, तापमान आणखी वाढणार, अंगाची लाहीलाही..

मृण्मयी देशपांडेचं चालतं फिरतं घर पाहिलत का? आता महिनाभर तिथेच राहणार, Viral Video

Kolhapur Gokul Politics : पंधरा दिवसांपूर्वी रुजू झालेले सहायक दुग्ध निबंधक कदम यांची तडकाफडकी बदली, गोकुळचे राजकारण तापलं; मुश्रीफांना अप्रत्यक्ष दणका

Latest Marathi News Live Update: राष्ट्रीय महिला आयोगाची टीम आज नाशिकमध्ये येणार

IPL 2026: कोलकता संघाला पहिल्या विजयाची प्रतीक्षा; गुजरातशी आज अहमदाबादमध्ये लढणार, रहाणेच्या नेतृत्वाचा कस, कशी असेल Playing XI

SCROLL FOR NEXT