पनवेल, ता. १२ (बातमीदार) : शहरातील वाढत्या वाहतूक नियमभंगाच्या पार्श्वभूमीवर पनवेल वाहतूक शाखेकडून विना परवाना वाहनचालकांविरोधात विशेष कारवाई मोहीम राबविण्यात आली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या आदेशान्वये ही कारवाई व्ही. के. हायस्कूल आणि वडाळा तलाव परिसरात करण्यात आली. या मोहिमेदरम्यान विना परवाना वाहन चालवणारे, तसेच मोटार वाहन कायद्यातील विविध कलमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली.
शालेय परिसर असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही कारवाई महत्त्वाची ठरली. अनेक वाहनचालकांकडे वैध परवाना नसल्याचे तसेच काही वाहनांमध्ये कागदपत्रांची पूर्तता नसल्याचे आढळून आले. वाहतूक नियमांचे काटेकोर पालन व्हावे, अपघातांना आळा बसावा आणि नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने ही विशेष मोहीम राबविण्यात आली असल्याचे वाहतूक शाखेकडून सांगण्यात आले. कारवाईनंतर वडाळा तलाव परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून अशा मोहिमा नियमितपणे राबविण्याची मागणीही केली आहे. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक जीवन शेरखाने यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेतील अंमलदार युवराज येळे, अमीर मुलाणी, ज्ञानेश्वर पवार व संदीप काळे यांच्या पथकाने संयुक्तपणे केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.